IND vs NZ WC 2023 Semi-final: सामन्यापूर्वी BCCI ने खेळपट्टी बदलल्याने खळबळ; त्या 6 नंबरच्या खेळपट्टीवर होणार सामना; जाणून प्रकरण..

0

IND vs NZ WC 2023 Semi-final: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये आज वानखेडे मैदानावर विश्वचषक 2023 चा पहिला सेमी फायनल सामना खेळवला जाणार आहे. न्युझीलंड संघाचे तगडे आव्हान भारतीय संघापुढे आहे. अशातच आता सेमी फायनल सामन्यापूर्वी भारत-न्यूझीलंड सामन्याला गालबोट लागले आहे. भारतीय संघाला फायदा व्हावा यासाठी बीसीसीआयने खेळपट्टी बदलल्याने खळबळ उडाली आहे.

कोणत्याही आयसीसी टूर्नामेंटमध्ये स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आयसीसी करत असते. भारतात वर्ल्ड कप होत असला तरी देखील खेळपट्टी कशी तयार करायची? सामन्याचे तिकीट या सगळ्याचे नियोजन आयसीसी पाहत असते. मात्र ICC ला विश्वासात न घेता बीसीसीआयने वानखेडेवर होणाऱ्या सामन्याची खेळपट्टी निवडल्याने आता खळबळ उडाली आहे.

मॅनेजमेंट आणि बीसीसीआयच्या विनंतीनुसार खेळपट्टीवरील घास कापण्यात आले असल्याचं आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतीय क्युरेटर यांनीही बीसीसीआईच्या मागणीनुसार आम्ही खेळपट्टी वरील घास कापले असल्याचे सांगितले आहे. वेगवान गोलंदाजांना मदत मिळू नये, यासाठी खेळपट्टीवरील घास कापण्यात आले. एवढेच नाही, तर सेमी फायनल सामना नवीन खेळपट्टीवर होणे अपेक्षित असते. मात्र दोन सामने झालेल्या खेळपट्टीवर हा सामना होणार असल्याने नाव वाद निर्माण झाला आहे.

वानखेडे मैदानावरील खेळपट्टी क्रमांक सातवर भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामना होणार होता. मात्र ऐनवेळी सहा नंबर खेळपट्टीवर सामना घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, हा निर्णय आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी ऍटकिन्सन यांना न विचारताच घेण्यात आला.

आयसीसीचे स्वतंत्र खेळपट्टी सल्लागार अँडी ऍटकिन्सन यांचा यासंदर्भात एक ईमेल देखील व्हायरल झाला आहे. ज्यामुळे या प्रकरणाची अधिक पुष्टी आणि चर्चा झाली आहे. भारतीय संघाचा पराभव टाळण्यासाठी खेळपट्टी निवडी शमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप देखील BCCI वर केला गेला आहे.

काय आहे खेळपट्टीचे गणित

न्युझीलंड आणि भारत सेमी फायनल सामना सात नंबर खेळपट्टीवर होणार होता. मात्र ऐनवेळी सहा नंबर खेळपट्टीवर सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी या खेळपट्टीवर दोन सामने झाले आहेत. जे दक्षिण आफ्रिका-इंग्लंड आणि भारत-श्रीलंका यांच्यामध्ये झाले आहेत. महत्वाचे म्हणजे,खेळपट्टी स्लो करण्यासाठी घास देखील कापण्यात आले आहे.

सहा नंबरची खेळपट्टी स्लो व्हावी, यासाठी घास कापण्यात आले. न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांना मदत मिळू नये. यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. स्पिन गोलंदाज यांना मदत मिळणारी खेळपट्टी बनवली असल्याने, आता वाद निर्माण झाला आहे. मात्र न्युझीलंड संघात देखील चांगले स्पिनर आहेत. त्यामुळे हा डाव भारतीय संघावरच पलटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हे देखील वाचा White rice side effects: तुम्हीही दररोज भात खाता? मग भात नाही तुम्ही खाताय विष; वाचा सविस्तर..

NZ vs IND Semi final: या दोन गोष्टी केल्या तरच भारत सेमी फायनल जिंकण्याची शक्यता; अन्यथा पराभव अटळ..

IND vs NZ World Cup 2023 Semi final: रॉस टेलरने रोहित शर्माला भरवली धडकी; ..म्हणाला न्युझीलंड प्रचंड धोकादायक कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.