NZ vs IND Semi final: ‘या’ दोन गोष्टी केल्या तरच भारत सेमी फायनल जिंकण्याची शक्यता; अन्यथा पराभव अटळ..

0

NZ vs IND Semi final: उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सेमी फायनल सामना खेळला जाणार आहे. (India vs New Zealand World Cup 2023 1st semi final) मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सेमी फायनल सामना होणार असल्याने टॉसला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये असला तरी सेमी फायनलमध्ये न्युझीलंडचे तगडं आव्हान आहे. जाणून घेऊया भारतीय संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर काय आवश्यक आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर सेमी फायनल सामना होणार असल्याने टॉस खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. महत्वपूर्ण सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. अनेक मोठ्या टीम्स याच धोरणानुसार मैदानात उतरतात. मात्र वानखेडे मैदानाचे गणित वेगळे आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर टॉस जिंकल्यानंतर, कोणताही संघ डोळे झाकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार नाही. त्याचे कारण म्हणजे, या मैदानावर धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करता येतो. संध्याकाळी अंडर लाईटमध्ये सुरुवातीची काही षटके खेळून काढल्यानंतर, खेळपट्टी पूर्णतः फलंदाजीसाठी अनुकूल ठरते. सुरुवातीच्या काही षटकात संघाला धक्के बसले, तर त्यातून सावरणे अवघडही होऊ शकतं. त्यामुळे फलंदाजी की गोलंदाजी हा मोठा पेच दोन्ही कर्णधारांपुढे असणार आहे.

टॉस दोन्ही कर्णधाराच्या हातात नसणार आहे. त्यामुळे कोणाची पहिली बॅटिंग किंवा बॉलिंग येईल, हे सांगता येत नाही. मात्र भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. जर भारतीय संघाची प्रथम फलंदाजी आली, तर भारतीय संघाला 300 ते सव्वा तीनशेच्या आसपास धावा कराव्या लागतील.

भारतीय संघाने 300 प्लस धावा केल्यानंतर, वानखेडेच्या मैदानावर अंडर लाईटमध्ये भारतीय गोलंदाज आग ओकू शकतात. संध्याकाळी जलदगती गोलंदाजाला सुरुवातीला मदत मिळत असल्याने, न्यूझीलंड संघाच्या सलामीवीर आणि प्रमुख फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळू शकते.

जर भारतीय संघाची पहिल्यांदा गोलंदाजी आली तर न्यूझीलंड संघाला अडीचशे ते 260 धावांमध्ये रोखावे लागेल. न्युझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर 300 धावांचे आव्हान ठेवले तरी देखील भारतीय संघ जिंकण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी भारतीय सलामीवीरांना न्यूझीलंडच्या गोलंदाजाची सुरुवातीची दहा-बारा षटके घेऊन काढावी लागणार आहेत. त्यानंतर न्युझीलंडने दिलेले आव्हान भारतीय संघ सहज पूर्ण करू शकतो.

हे देखील वाचा IND vs NZ World Cup 2023 Semi final: रॉस टेलरने रोहित शर्माला भरवली धडकी; ..म्हणाला न्युझीलंड प्रचंड धोकादायक कारण..

IND vs NZ 1st Semi final: वानखेडेच्या ज्या खेळपट्टीवर सामना होणार ती भारतासाठी आहे धोकादायक; जाणून घ्या पीच आणि टॉसचे गणित..

England tour West Indies: सुमार कामगिरीनंतर इंग्लंडच्या सहा दिग्गजांना डच्चू; आगामी मालिकेच्या संग निवडीची जोरदार चर्चा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.