IND vs AUS World Cup 2023 final: भारत प्रचंड तुल्यबळ, पण त्या एका कारणामुळे ऑस्ट्रेलियाच मारणार बाजी..

0

IND vs AUS World Cup 2023 final: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS world Cup Final) यांच्यामध्ये रविवारी वर्ल्ड कप २०२३ ची फायनल खेळवली जाणार आहे. वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi cricket stadium Ahmedabad) पार पडेल. जगातील सगळ्यात मोठे क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या या मैदानावर तब्बल एक लाख 35 हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे.

भारतीय संघ या स्पर्धेत लगातार दहा सामने एकतर्फी जिंकला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने देखील सुरुवातीच्या दोन सामन्यानंतर, लगातार आठ सामने जिंकले आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाने संघर्ष करत अनेक सामने जिंकले आहेत. दोन्ही संघाच्या खेळाची तुलना करायची झाल्यास, फायनल सामन्यात भारतीय संघ प्रचंड बलशाली असल्याचं दिसतं.

ऑस्ट्रेलिया पेक्षा भारतीय संघ फायनल सामन्यात प्रचंड तुल्यबळ असला तरी ऑस्ट्रेलियाकडे पाच वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव आणि तब्बल आठ वेळा फायनल खेळण्याचा अनुभव देखील आहे. दुसरीकडे भारतीय संघावर अपेक्षांचे ओझ असल्याने, दबाव हा खूप मोठा फॅक्टर राहणार आहे. दबावाचा सामना कसा करायचा, हे ऑस्ट्रेलिया गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आला आहे.

वर्ल्ड कपमध्ये नॉक आउट सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ अधिक धोकादायक बनतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान भारतासाठी सोपं नसणार आहे. ऑस्ट्रेलिया भारताच्या खेळाडूंच्या फॉर्म विषयी बोलायचं झाल्यास, भारतीय संघाचे खेळाडू प्रचंड लईत आहेत. मात्र दबाव हा दोन्ही संघांच्या विजयाचा मध्य असणार आहे.

फायनलच्या सामन्यात जो संग दबावाला अधिक पद्धतशीरपणे हाताळेल तोच संघ या सामन्यात अधिक फेवरेट मानला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघ फेअरलेस क्रिकेट खेळण्यात मातब्बर आहे. भारत या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत फेअरलेस खेळ करत आला आहे. मात्र फायनलचा दबाव रोहित शर्मा आणि टीम इंडिया कशी हाताळते, यावर सर्व काही अवलंबून असेल.

हे देखील वाचा Semi Final Pitch Controversy: मुंबई प्रमाणे फायनल सामन्याची खेळपट्टीही बदलली जाणार; विलियम्सनच्या विधानाने..

England tour West Indies: सुमार कामगिरीनंतर इंग्लंडच्या सहा दिग्गजांना डच्चू; आगामी मालिकेच्या संग निवडीची जोरदार चर्चा..

Acharya Chanakya Niti: या तीन ठीकणी पैसे खर्चास कंजुषी केल्यास लक्ष्मी राहते नेहमी नाराज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.