Team India head Coach | राहुल द्रविड नंतर या चौघांपैकी एकाच्या गळ्यात पडणार प्रशिक्षक पदाची माळ..

0

Team India head Coach | नुकताच एकदिवदिय विश्वचषक पार पडला आहे. (World Cup 2023) बीसीसीआयने (BCCI) यशस्वीरित्या विश्वचषकाचे आयोजन केले. भारतामध्ये विश्वचषक होत असल्याने अनेकांना भारतीय संघ विजेता होईल, असं वाटत होतं. मात्र फायनलच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. ऑस्ट्रेलियाने महत्वाच्या सामन्यात आपला खेळ उंचावत भारतीय संघाचा सहा गडी राखून ऐतिहासिक विजय साकारला.

विश्वचषक फायनलच्या परभवा बरोबरच भारतीय क्रिकेट संघाचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाल पूर्ण झाला. राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक पद दोन वर्ष सांभाळले. बीसीसीआयने राहुल यांच्यासोबत प्रशिक्षक पदासाठी दोन वर्षाचा तक्रार केला होता. आपल्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात राहुल द्रविड यांना एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही.

विश्वचषक जिंकून शेवट गोड करण्याची मोठी संधी राहुल द्रविड यांच्याकडे होते. मात्र फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभव बरोबरच राहुल द्रविड यांचे विश्वविजेता होण्याचे स्वप्नही भंगले. राहुल द्रविड नंतर आता बीसीसीआय नवीन प्रशिक्षक निवडीच्या तयारीत असून चार नावेही चर्चेत आहेत.

राहुल द्रविड यांना भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर पुन्हा कार्यरत राहण्याची संधी होती. मात्र राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सांभाळण्यास इच्छूक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी सिरीजसाठी हंगामी प्रशिक्षक पद म्हणून व्ही व्ही एस लक्ष्मणची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया सिरीज नंतर भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची निवड प्रक्रिया पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी दोन विदेशी आणि दोन भारतीय नावे चर्चेत आहेत. आशिष नेहरा (ashish nehra) वीरेंद्र सेहवाग (virender sehwag) ऑस्ट्रेलियाचे टॉम मुडी आणि न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) या चौघांची नावे चर्चेत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचे गेले दोन प्रशिक्षक भारतीय होते. त्यामुळे भारता शिवाय आता विदेशी प्रशिक्षकांच्या निवडी विषयी BCCI सकारात्मक असल्याची माहिती आहे. आशिष नेहरा, टॉम मूडी, वीरेंद्र सेहवाग आणि स्टीफन फ्लेमिंग या चौघां पैकी स्टीफन फ्लेमिंगची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचाIND vs AUS 1St T20: Disney+ hotstar वर नाही दिसणार भारत ऑस्ट्रेलिया T20 सिरीज.. 

IND vs AUS T20 series: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मालिकेसाठी धक्कादायक संघाची निवड; या चार खेळाडूंना डच्चू दिल्याने नाव वाद..

Narendra Modi meet Indian cricket team: पराभवानंतर ड्रेसिंग रूम मधील तो व्हिडिओ व्हायरल; रोहितचा किशातून हात काढत नरेंद्र मोदी म्हणाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.