IND vs AUS T20 series: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मालिकेसाठी धक्कादायक संघाची निवड; या चार खेळाडूंना डच्चू दिल्याने नाव वाद..

0

IND vs AUS T20 series: विश्वचषक 2023 (world Cup 2023) मध्ये दमदार कामगिरी करूनही भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी जिंकता आली नाही. 2023 मध्ये कोणत्याही संघापेक्षा सर्वाधिक दहा सामने जिंकूनही भारतीय संघ ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला. साखळी सामन्यातले नऊ आणि सेमी फायनल सामना एकहाती जिंकून भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र आयसीसी स्पर्धेचा राजा म्हणून नावलौकिक असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभवाची धूळ चारत सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली जिंकली.

भारतीय संघाला विश्वचषक फायनलमध्ये अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. पराभव पाहावा लागल्यानंतर, अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. या धक्क्यातून सावरतो की नाही, तोवरच आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या आगामी टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक धक्कादायक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर चांगली कामगिरी करणाऱ्या चार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

विश्वचषक जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघ मायदेशात परतला नाही. विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात आली होती. आता वर्ल्ड कप नंतर पाच टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतामध्येच थांबला आहे. या मालिकेला 23 नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे.

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची तयारी म्हणून, या मालिकेकडे पाहिले जात आहे. असं असलं तरी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. परंतु चांगली कामगिरी करूनही चार खेळाडूंना संघात स्थान न दिल्याने, आता निवड समितीवर टीकेची झोड उडाली आहे. या मालिकेसाठी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची (SuryaKumar Yadav) निवड करण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी देण्यात आली आहे.

वेस्टइंडीज आणि आयर्लंड दौऱ्यात दमदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा निवड समितीने डावलले आहे. एशियन गेम्समध्ये देखील संजूला संधी देण्यात आली नव्हती. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या सैयद अली मुश्ताक ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रियान परागला देखील डावलण्यात आले आहे.

दमदार कामगिरी करणाऱ्या युझवेंद्र चहलला देखील भारताच्या T20 संघात संधी देण्यात आली नाही. उमरान मलिकला देखील संधी दिली गेली नाही. भारताच्या t20 संघात अनेक धक्कादायक चेहऱ्यांना संधी दिल्याने नवा वाद देखील निर्माण झाला असून, अजित आगरकर (Ajit agarkar) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या T 20 मालिकेसाठी भारतीय संघ; 

सूर्यकुमार यादव (कर्णधार) ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), इशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, शिवम दुबे, मुकेश कुमार. (श्रेयस अय्यर चौथ्या आणि पाचव्या t20 साठी भारताच्या संघाचा भाग असेल. त्याच्याकडे पदाची जबाबदारी देखील देण्यात येणार आहे)

हे देखील वाचा Chanakya quotes: फसव्या बायकांना कसे ओळखाल? चाणक्यांनी सांगितले चार मार्ग..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.