Narendra Modi meet Indian cricket team: पराभवानंतर ड्रेसिंग रूम मधील तो व्हिडिओ व्हायरल; रोहितचा किशातून हात काढत नरेंद्र मोदी म्हणाले..

0

Narendra Modi meet Indian cricket team: लगातार 10 सामने जिंकून भारतीय संघ विश्वचषक फायनलमध्ये पोहोचला. अगदी दाही सामने एकत्र फ्री जिंकत भारतीय संघाने या स्पर्धेतला सर्वोत्तम संघ असल्याचे सिद्ध देखील केलं. मात्र फायनलच्या सामन्यात भारतीय संघ दबावाला झेलू शकला नाही. फायनल च्या सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात सुमार कामगिरी झाली. आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

अपराजित राहत भारतीय संघ फायनल मध्ये पोहोचल्याने विश्वचषक 2023 चा वर्ल्ड कप भारतीय संघ सहज जिंकेल असं अनेकांना वाटत होतं. अनेक क्रिकेट विश्लेषक, माजी दिग्गज खेळाडू, आणि क्रिकेट चाहत्यांना देखील भारतीय संघाचा विजय निश्चित असल्याचे दिसत होते. मात्र नेमकी फायनलमध्येच भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. पराभवानंतर भारताच्या अनेक खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. कॅमेरात हे चित्र टिपले गेले. मात्र भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हे चित्र प्रचंड वेदनादायी होते.

विश्वचषक फायनल पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील मैदानात उपस्थित होते. पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंची भेट देखील घेतली. आता या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामन्यानंतर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) ड्रेसिंग रूममध्ये पोहचले.

ड्रेसिंग रूममध्ये पोहचल्यानंतर नरेंद्र मोदी खेळाडूंना शुभेच्छा देताना म्हणाले, खेळात जय पराजय होत राहतात. तुम्ही लगातार दहा सामने जिंकले आहेत. तुमचा खेळ दमदार होता. तुम्ही एकमेकांना साथ द्या. एकमेकांचे मनोबल वाढवा. तुम्ही खूप मेहनत केली आहे. पण खेळात असं होत असते. एकमेकांना साथ द्या, एकमेकांचे मनोबल वाढवत चला.

रोहित शर्माच्या खिशातून हात काढत मोदी म्हणाले, देश तुम्हाला पाहतोय. मी विचार केला तुम्हा सगळ्यांना एकदा भेटावे. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना निमंत्रण आहे. दिल्लीला आल्यावर आपण भेटू. एवढंच नाही, मोहम्मद शमीला ओढून घेत मोदी म्हणाले, शमी तू यावेळेस चांगला खेळलास. नरेंद्र मोदींचा ड्रेसिंग रूम मधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे देखील वाचा IND vs AUS T20 series: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मालिकेसाठी धक्कादायक संघाची निवड; या चार खेळाडूंना डच्चू दिल्याने नाव वाद..

Chanakya quotes: फसव्या बायकांना कसे ओळखाल? चाणक्यांनी सांगितले चार मार्ग..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.