BCCI Discuss Rohit Sharma | रोहित शर्माने सोडलं कर्णधारपद! वनडे, कसोटी संघात खेळणार; मात्र T-20 तूनही माघार..

0

BCCI Discuss Rohit Sharma | नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने फायनल पर्यंत मजल मारली. लगातार दहा सामने जिंकून भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये प्रबळ दावेदार मानला जात होता. भारतीय संघ फायनल जिंकेल, अशी अनेकांना आशा होती. मात्र ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव करत अनेकांचे स्वप्नभंग केले. राहुल द्रविड नंतर आता रोहित शर्माचा देखील बळी गेला आहे

बीसीसीआयचा रिपोर्टनुसार, उद्या रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड समिती आणि बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. आपल्या वनडे आणि कसोटी क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात उद्याच्या बैठकीत रोहित शर्मा सोबत चर्चा होणार आहे. आपल्या एकदिवसीय करिअर विषयी रोहितचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासंदर्भात मीटिंग बोलवली गेली आहे.

विश्वचषक 2023 पूर्वी टी ट्वेंटी क्रिकेटसाठी आम्ही नवीन कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली नवीन संघाची बांधणी करत असल्याचे रोहित शर्माला सुचवण्यात आलं होतं. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मला संधी मिळाली नाही तरी देखील हरकत नसल्याचे रोहित शर्माने स्पष्ट देखील केल्याची माहिती आता समोर आली आहे.

वेस्टइंडीजमध्ये होणाऱ्या आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी आता रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग नसणार आहे. एवढेच नाही, तर एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या करिअरला तो कुठे पाहतो, हे देखील बीसीसीआय उद्याच्या मीटिंगमध्ये जाणून घेणार आहे. विराट कोहलीला (Virat kohli) भारतीय टी-ट्वेंटी संघात स्थान द्यायचे की नाही, याविषयी निर्णय आयपीएल नंतर निर्णय घेतला जाणार आहे.

रोहीत शर्मा मात्र यापुढे भारतीय टी-ट्वेंटी संघात चाहत्यांना पाहायला मिळणार नाही. याविषयी अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी बीसीसीआयने या संदर्भात रिपोर्ट देखील जारी केले आहेत. माध्यमांना दिलेल्या माहितीत या विषयी स्पष्टता केली असून, रोहित शर्मा आगामी टी-ट्वेंटी संघाचा भाग नसणार आहे. हेही सांगण्यात आले आहे.

2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप पर्यंत रोहित शर्मा वयाची चाळीशी ओलांडणार आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील तो स्वतःला कुठे पाहतो, याविषयी उद्या अधिक स्पष्टता येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा पुढची दोन वर्ष एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व करेल. दोन वर्षात आपल्या मार्गदर्शनाखाली नवा कर्णधार तयार करण्याचे काम देखील रोहित शर्माकडे दिले जाणार असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा Team India head Coach | राहुल द्रविड नंतर या चौघांपैकी एकाच्या गळ्यात पडणार प्रशिक्षक पदाची माळ..

Narendra Modi meet Indian cricket team: पराभवानंतर ड्रेसिंग रूम मधील तो व्हिडिओ व्हायरल; रोहितचा किशातून हात काढत नरेंद्र मोदी म्हणाले..

IND vs AUS 1St T20: Disney+ hotstar वर नाही दिसणार भारत ऑस्ट्रेलिया T20 सिरीज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.