White rice side effects: तुम्हीही दररोज भात खाता? मग भात नाही तुम्ही खाताय विष; वाचा सविस्तर..
White rice side effects: भारतीय नागरिकांच्या जेवणामध्ये मुख्य पदार्थ भात (rice) आहे. हे तुमच्यापैकी प्रत्येक जण मान्य करेल. अनेकांना जेवणात भात नसेल, तर जेवण केल्यासारखे वाटतही नाही. मात्र तुमची ही सवय आरोग्यासाठी प्रचंड घातक आहे. अनेकांना मुबलक प्रमाणात भात खाण्याची सवय असते. आठवड्यात एक दोन वेळा नाही, तर रोजच्या तीनही वेळच्या जेवणात भात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.
तर तुम्ही दररोज मोठ्या प्रमाणात भात खात असाल, तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देत आहात. दररोज मोठ्या प्रमाणात भात खाल्ल्याने तुम्हाला मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता असल्याचं संशोधनातून समोर आले आहे. ग्लाइसेमिक इंडेक्स हा घटक भातामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले जाते.
जर तुम्ही दररोज मोठ्या प्रमाणात भात खात असाल, तर तुम्हाला विटामिन आणि मिनरल्सची देखील कमतरता जाणवू शकते. भातामध्ये खूप कमी प्रमाणात फायबर असते. किंबहुना नाहीच्या बरोबरच असते. शरीरासाठी फायबर युक्त पदार्थांचे सेवन फार आवश्यक आहे. भाताच्या अतिसेवनामुळे हाडे देखील कुमकुत होतात.
जर तुम्ही वजन नियंत्रणात आणू इच्छित असाल, आणि नियमितपणे भात खात असाल तर तुमचं वजन कमी होणार नाही. हे लक्षात घ्या. भात वजन वाढीसाठी फार पोषक आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीचे प्रमाण असते. दररोज मोठ्या प्रमाणात भात खाल्ल्याने तुमचे पोट आणि कमरेची फॅट मोठ्या प्रमाणात वाढली जाते.
बद्धकोष्ठता
भात हा फायबरचा स्त्रोत नाही. भातामध्ये खूप कमी प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोटाचे अनेक विकार जडू शकतात. नियमित मोठ्या प्रमाणात भात खाल्ल्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेला सामोरे जावे लागू शकते. नियमित मोठ्या प्रमाणात भात खाल्ल्याने पोट साफ न होणे ही सामान्य बाब आहे. मात्र त्याचे परिणाम फार गंभीर आहेत.
हे देखील वाचा NZ vs IND Semi final: या दोन गोष्टी केल्या तरच भारत सेमी फायनल जिंकण्याची शक्यता; अन्यथा पराभव अटळ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम