MS Dhoni On relationship: नात्याविषयी MS Dhoni ने दिला भन्नाट सल्ला; म्हणाला, सगळ्या मुली सारख्याच..”; पाहा व्हिडिओ..
MS Dhoni On relationship: अजूनही महेंद्रसिंग धोनीची (ms dhoni) प्रचंड मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. धोनी जितका उत्कृष्ट खेळाडू होता, त्याहूनही अधिक उत्कृष्ट तो माणूस असल्याचं बोललं जातं. त्याच्या साधेपणाची चर्चा नेहमी होत राहते. चांगल्या क्रिकेटर पेक्षा चांगला माणूस म्हणून मला ओळखले जावे, अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती. असं स्वतः महेंद्रसिंग धोनीने एका कार्यक्रमात म्हंटले. याच कार्यक्रमात धोनीने तरुणांना रिलेशनशिप विषयी देखील सल्ला दिला आहे.
महेंद्रसिंग धोनीने एका कार्यक्रमात अनेक विषयांवर भाष्य केलं. सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. महेंद्रसिंग धोनीने विश्वचषकाविषयी (world Cup 2023) देखील आपलं मत नोंदवलं. मात्र आता या सगळ्यांमधून महेंद्रसिंग धोनीने तरुणांना रिलेशनशिप विषयी दिलेल्या सल्ल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
महेंद्रसिंग धोनीने ज्याप्रमाणे क्रिकेटचे मैदान गाजवलं. त्याचप्रमाणे तो एक आदर्श पिता आणि पती म्हणूनही उदयास आला आहे. सामान्यांशी भेटताना महेंद्रसिंग धोनीचा साधेपणा अनेकांना आपलंसं करून जातो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची आणि सामान्य माणसाची भेट या दोन्हींमध्ये सारखेच इमोशन असल्याने, तो अनेकांना आपलासा वाटतो.
महेंद्रसिंग धोनीच्या एकूण लाईफस्टाईल विषयी अनेकांना कुतूहल असतं. तो काय करतो, काय सांगतो. याला विशेष महत्त्व असून, अनेक जण त्याला फॉलोही करतात. त्यामुळे त्याच्या प्रत्येक वाक्याची मोठी हेडलाईन होते. एका कार्यक्रमात रिलेशनशिप विषयी त्याने तरुणांना दिलेल्या सल्ल्याची देखील सध्या जोरदार चर्चा होत आहे. रिलेशनशिप विषयी बोलताना धोनी म्हणाला, प्रत्येकाने एकमेकांचा सन्मान करणे फार आवश्यक असते.
लग्न केल्यानंतर, तुम्ही तुमचा पार्टनर सोबत खुश राहण्यासाठी फार काही आवश्यक नसतं. मात्र दोघांनीही एकमेकांचा सन्मान केला, तर नात्यात फारशी अडचणीत येत नाही. पुढे बोलताना महेंद्रसिंग धोनी म्हणाला, माझा तरुणांना एक सल्ला असेल, ज्यांच लग्न झालं नाही, ज्यांना गर्लफ्रेंड आहे, अशाने चुकूनही समजू नका माझी वाली वेगळी आहे.
🤣🤣@msdhoni pic.twitter.com/D2Sg4WIUXt
— Raghu (@meerkali7781) October 26, 2023
धोनीने तरुणांना दिलेल्या सल्ल्यानंतर, उपस्थित तरुणांमध्ये जोरदार हसा पिकला. धोनीचा हा हटके अंदाजही चाहत्यांना पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.
हे देखील वाचा MS Dhoni On WC 2023: भारत वर्ल्ड कप जिंकेल का? महेंद्रसिंग धोनीच्या उत्तराने उंचावल्या भुवया..
ODI WC 2023 : चार वर्षात दोन World Cup जिंकणाऱ्या इंग्लंडची इतकी वाताहात का झाली?
Nokia 105 Classic : Nokia ने लॉन्च केला 999 रुपयांत 105 Classic मोबाईल; UPI सह मिळणार हे फीचर्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम