MS Dhoni On WC 2023: भारत वर्ल्ड कप जिंकेल का? महेंद्रसिंग धोनीच्या उत्तराने उंचावल्या भुवया..

0

MS Dhoni On WC 2023: प्रबळ दावेदार मांडल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाला सेमी फायनलमध्ये गाशा गुंडाळावा लागल्याने, ही स्पर्धा आणखीन चर्चेत आली आहे. दुसरीकडे वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघापुढे अनेक आव्हाने होती. मात्र या विश्वचषकात भारतीय संघाच्या खेळाडूंनी आपला खेळ कमालीचा उंचवत अनेकांना धक्का दिला. पाच सामन्यात पाच विजयासह भारतीय संघ सध्या विश्वचषक स्पर्धेच्या गुंतलिकेत अव्वल क्रमांकावर आहे. अशातच आता महेंद्रसिंग धोनीचे एक विधान चर्चेचा विषय बनले आहे. (MS Dhoni on WC 2023)

विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला कोणी पराभूत करेल, असा एकही संघ असल्याचं पाहायला मिळत नाही. अशातच आता एका कार्यक्रमात महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) भारतीय संघ विश्वचषक जिंकेल का? या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन विश्वचषक आणि एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार म्हणूनही, धोनीकडे पाहिलं जातं. क्रिकेट विषयी धोनीची समज अफलातून आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडू देखील दमदार खेळाचे प्रदर्शन करतो, हे अनेकदा पाहिला मिळाले आहे.

महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानावर केलेल्या अनेक अशक्यप्राय पराक्रमामुळे क्रिकेट विषयी त्यांच्या बोलण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महेंद्रसिंग धोनी सहसा एखाद्या कार्यक्रमांमध्ये क्रिकेट विषयी फारसं बोलत नाही. मात्र यावेळी महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषक जिंकेल का? या प्रश्नाला मोकळेपणाने उत्तर दिलं आहे.

महेंद्रसिंग धोनीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तो म्हणाला, या वर्ल्डकप मधील भारतीय संघ दमदार आहे. संघामध्ये उत्तम समतोल असल्याचे दिसते. खेळाडू देखील चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत आहेत. सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत आहेत. त्यामुळे मी याविषयी फारसं बोलणार नाही. मात्र हुशार माणूस समजून जाईल. असं विधान महेंद्रसिंग धोनीने केले आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या या विधानामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय संघ यावर्षी विश्वचषक जिंकेल, असं महेंद्रसिंग धोनीने स्पष्ट केलं नाही. मात्र अप्रत्यक्ष धोनीच्या उत्तराचा अर्थ तोच होत असल्याचं बोललं जात आहे. भारतीय संघाचा पुढील सामना आता रविवारी 29 नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध नखनऊ मैदानावर पार पडणार आहे. या विजया बरोबरच भारतीय संघ सेमी फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल.

हे देखील वाचा ODI WC 2023 : चार वर्षात दोन World Cup जिंकणाऱ्या इंग्लंडची इतकी वाताहात का झाली?

IND vs ENG WC Match : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया संकटात; दुखापतीमुळे स्टार खेळाडू दोन सामन्यातून बाहेर..

Chanakya quotes: विशी ओलांडल्यानंतर चुकूनही करू नका ही चूक, अन्यथा जिवंतपणी भोगाल त्या सगळ्या यातना..

IND vs ENG: हार्दिक पांड्याच्या दुखपतीविषयी मोठी अपडेट; इंग्लंड विरुद्ध खेळणार की नाही? Playing 11 झाली स्पष्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.