IND vs ENG WC Match : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया संकटात; दुखापतीमुळे स्टार खेळाडू दोन सामन्यातून बाहेर..
IND vs ENG WC Match : विश्र्वचषक 2023 (world Cup 2023) मध्ये दमदार फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला आता इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. न्युझीलंड संघाला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाचा पुढील सामना 29 नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध होणार आहे. इंग्लंडचा संघ चांगला खेळ करत नसला तरी इंग्लंडकडे भक्कम फलंदाजी आहे. त्यामुळे हा सामना अटीतटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय संघाला लखनऊमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळायचे आहे. लखनऊची खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना साथ देणारी असल्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढे प्लेइंग इलेव्हनचे मोठे आव्हान असणार आहे. त्याचे कारण म्हणजे, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) इंग्लंड आणि श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. तो थेट दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार आहे.
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे प्लेइंग11 चे कॉम्बिनेशन बिघडलं आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता एक अतिरिक्त स्पिन गोलंदाज खेळवता येणार नाही. भारतीय संघाला तीन जलदगती गोलंदाज आणि दोन स्पिनर याच कॉम्बिनेशनसह मैदानात उतरावे लागणार आहे. न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने याच नियतीनुसार सामना खेळला जिकलाही. मात्र इंग्लंड विरुद्ध होणारा सामना लखनऊमध्ये आहे.
लखनऊची खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना साथ देते. त्यामुळे ही तीन जलदगती आणि दोन स्पिन गोलंदाज ही रणनीती किती असरदार ठरेल. हे सामन्यातच पाहायला मिळेल. इंग्लंड विरुद्ध जर हार्दिक पांड्या अवेलेबल असला असता, तर शार्दुल ठाकूरला बाहेर ठेवून रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली असती. अश्विनच्या सहभागामुळे आठव्या क्रमांकावर एक फलंदाजही मिळाला असता.
हार्दिक पांड्यामुळे भारतीय संघाला एक फलंदाज आणि गोलंदाजाचा ऑप्शन मिळत होता. आता मात्र एक अतिरिक्त फलंदाज आणि एक अतिरिक्त स्पेशालिस्ट गोलंदाजाला संघात संधी द्यावी लागत आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धचा संघच इंग्लंड आणि श्रीलंके विरुद्ध मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवला (suryakumar Yadav) आणखी एक संधी मिळणार आहे. त्याच्या खेळाकडे टीम मॅनेजमेंटचे लक्ष असणार आहे.
हे देखील वाचा Indian cricket team head coach: मोठी बातमी! मुंबईकर Amol Muzumdar भारतीय क्रिकेट टीमच्या कोच पदी विराजमान..
UT69 : राज कुंद्रा शिल्पा शेट्टी खरंच वेगळे झालेत? झाला मोठा खुलासा..
Sexual relationship : संबंधासाठी ही वेळ आहे घातक; जाणून घ्या कारण आणि संबंधाची योग्य वेळ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम