Nokia 105 Classic : Nokia ने लॉन्च केला 999 रुपयांत 105 Classic मोबाईल; UPI सह मिळणार हे फीचर्स..
Nokia 105 Classic : स्मार्टफोनमुळे लहान मोबाईलचे महत्व कमी झाले आहे. असं असलं तरी Nokia ने मात्र 105 Classic हा फोन लाँच केला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, या phone ची किंमत केवळ 999 रुपये ठेवली आहे. सॅमसंगने आपल्या लहान मोबाईलची निर्मिती बंद केल्याने, नोकियाने हा मोठा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे.
आपल्या दर्जेदार उत्पादनासाठी नोकिया ओळखला जायचा. मात्र अँड्रॉइड फोनमुळे या कंपनीचे मार्केट डाउन झाले. Samsang ने बाजारात ग्राहकांच्या मागणीवर घाव घातला. आणि अल्पावधीच Samsung लोकप्रिय झाला. Samsung चे छोटे फोन देखील कमालीचे लोकप्रिय झाले. मात्र आता Samsung ने आपल्या लहान फोनची निर्मिती बंद केली.
आता ही पोकळी भरून काढण्यासाठी नोकियाने 105 Classic हा मोबाईल लॉन्च केला आहे. ज्याची किंमत केवळ 999 रुपये ठेवण्यात आली आहे. काल २६ ऑक्टोबरला लॉन्च केलेला, हा फोन एकूण चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. यामध्ये सिंगल, ड्युअल सिम तसेच विथ चार्जर, विदाऊट चार्जर असा समावेश असणार आहे.
फीचर्स
HMD ग्लोबलने लॉन्च केलेल्या Nokia 105 Classic फोनमध्येच UPl ॲप दिले आहे. नोकिया मोबाईलच्या या फीचरमुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित यूपीआय पेमेंट करता येणार आहे. या फीचर्स बरोबरच नोकियाने लॉन्च केलेल्या या फोनमध्ये वायरलेस एफएमची सुविधा देखील देण्यात आली आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या फोनमध्ये तब्बल 800 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण क्षमतेने चार्ज केल्यानंतर, हा फोन तुम्ही तब्बल दोन दिवस वापरू शकता. या फोनची सुरुवातीची किंमत 999 रुपयापासून 1300 रुपयांपर्यंत असणार आहे. सिंगल सिम त्याचबरोबर विनर चार्ज असणारा फोन 999 रुपयाला मिळणार आहे.
हे देखील वाचा Chanakya quotes: विशी ओलांडल्यानंतर चुकूनही करू नका ही चूक, अन्यथा जिवंतपणी भोगाल त्या सगळ्या यातना..
RAILTEL Recruitment: पदवीधरांसाठी रेल्वेत नोकरीची मोठी संधी; लगेच करा असा अर्ज..
ENG vs SL: इंग्लंड अधिकृतरित्या बाहेर! श्रीलंकेच्या विजयाबरोबरच स्पष्ट झाले चार सेमी फायनललिस्ट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम