ENG vs SL: इंग्लंड अधिकृतरित्या बाहेर! श्रीलंकेच्या विजयाबरोबरच स्पष्ट झाले चार सेमी फायनललिस्ट..
ENG vs SL: विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंड विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी इंग्लंडच विश्वचषक जिंकेल, असं स्पष्ट केलं होतं. मात्र विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंड सेमी फायनलच्या रेस मधून बाहेर जाणारी तिसरी टीम ठरली आहे. अफगाणिस्ताने पराभूत केल्यानंतर, इंग्लंडला आता श्रीलंकेनेही पराभवाची धूळ चारत विश्वचषकाच्या गुणतालिकेत कमालीचे उलटफेर केले आहेत.
श्रीलंकेने इंग्लंडचा केलेल्या दारुण पराभवामुळे आता विश्वचषक 2023 मधील सेमी फायनलमध्ये जाणाऱ्या चार संघांची नावेही स्पष्ट झाली आहेत. आतापर्यंत अधिकृतरित्या एकही संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला नसला तरी जवळपास चार सेमी फायनललीस्टची नावे निश्चित झाली आहेत.
2015 नंतर इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेट कसे खेळायचे हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. आपल्या आक्रमकतेमुळे इंग्लंड संघाने अशक्यप्राय वाटणाऱ्या धावांचा अनेकदा पाठलाग करत एखहाती विजयाची नोंदही केली. मात्र या विश्वचषकात इंग्लंड संघाची फलंदाजी अक्षरशः पत्याप्रमाने कोसळताना पाहायला मिळाली. आज पुन्हा एकदा श्रीलंकेने इंग्लंड संघाला केवळ 156 धावामध्ये गारद केले.
श्रीलंके विरुद्ध झालेल्या दारुण परभवाबरोबरच या विश्वचषकातील इंग्लंडचे आव्हान अधिकृतरीत्या संपुष्टात आले आहे. इंग्लंडच्या पराभवामुळे आता ऑस्ट्रेलियाला फायदा झाला आहे. सेमी फायनलच्या रेसमध्ये ऑस्ट्रेलियाचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. उर्वरित चार सामन्यात ऑस्ट्रेलियाला केवळ तीन विजय आवश्यक आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाला आपले चार सामने न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान या चार संघासोबत खेळायचे आहेत. अफगाणिस्तान, बांगलादेश, आणि इंग्लंड हे तीन सामने ऑस्ट्रेलियासाठी आव्हानात्मक नसणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पराभूत झाला तरी देखील ऑस्ट्रेलियाकडे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची सर्वाधिक संधी असणार आहे.
पाच विजयासह भारतीय संघ विश्वचषकात अव्वल स्थानावर आहे. पाच सामन्यात चार विजयासह दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. हे तीन संघ सेमी फायनलमध्ये जवळपास पोहोचल्यात जमा आहेत. इंग्लंडच्या पराभवामुळे आता सेमी फायनलचा चौथा संघ म्हणून, ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक संधी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्येही आला आहे.
हे देखील वाचा IND vs ENG WC Match : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया संकटात; दुखापतीमुळे स्टार खेळाडू दोन सामन्यातून बाहेर..
UT69 : राज कुंद्रा शिल्पा शेट्टी खरंच वेगळे झालेत? झाला मोठा खुलासा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम