पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावर अवधूत वाघ म्हणतात…..

0

महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रा विषयी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहित,मला या पत्रामुळे खूप दुःख झाल्याचं म्हटलं होतं. आता यावर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या पत्राद्वारे हिंदुत्वाचे आठवण करून देते,तुम्ही हिंदुत्वाच्या विचारांचे समर्थक आहात. बार,रेस्‍टॉरंट चालू,परंतु देव कुलुल बंद का? असा सवाल करत महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ खुली करण्याचे आवाहन केले होते. या घटनेवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत राज्यपालांनी वापरलेल्या भाषेविषयी मला खूप दुःख झाल्याचे पंतप्रधान मोदींना ट्विट करत म्हटलं होतं. यामध्ये पवारांनी मोदींना,तुम्ही कोशारी यांनी लिहिलेल्या पत्राची दखल घेतलीच असेल,असंही म्हटलं होतं.

शरद पवार यांनी मोदींना ट्विटरद्वारे,लिहिलेल्या पत्रावर भाजप नेते अवधूत वाघ यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अवधूत वाघ लिहितात,राज्यपालांची तक्रार केली पंतप्रधानांकडे…
पंतप्रधान म्हणतील…You are knocking at wrong door…
काकासाहेबांना ५० वर्षांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आहे. असं ट्विट करत अवधूत वाघ यांनी शरद पवारांच्या पत्रावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.