भाजपचा अजब तर्क; …तर बिहारचा काश्मीर होईल!

0

बिहार विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांवर २८ ते ९ नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यात मतदान होणार असून प्रत्येकाने प्रचारावर जोर दिल्याचे दिसून येते आहे.

बिहारमध्ये,जर महागटबंधनचे सरकार आले तर,बिहारचा काश्मीर होईल. एवढेच नाही तर कश्मीरमधील आतंकवादी बिहारमध्ये आश्रय घेतील. असा अजब तर्क केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लावला. ते हाजीपुर रॅलीत लोकांना संबोधित करताना बोलत होते.

असाच एक तर्क अमित शहा यांनी 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत लावला होता. सुपौलमध्ये एका रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले होते, बिहारमध्ये जर भारतीय जनता पार्टी हारली तर, पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.