Vikas Divyakirti: लग्नाअगोदर दोन-तीन ब्रेकअप गरजेचे; दिव्यकीर्ती यांनी सांगितलेले कारण जाणून तुम्हालाही पटेल..

0

Vikas Divyakirti: कोणतेही नातं माणसाच्या आयुष्यात आनंद भरण्यासाठी खूप गरजेचे आहे. नात्याशिवाय माणसाचे आयुष्य एकप्रकारे व्यर्थ असल्याचं तुमच्यापैकी प्रत्येकजण मान्य करेल. कोणतंही नातं दोन्ही व्यक्तींचे विचार आणि समजूतदारपणा यावर टिकून असतं. नाती तुटण्याची अनेक कारणे असली तरी गैरसमज हे एक प्रमुख कारण आहे. मात्र नाती तुटण्याचे अनेक फायदेही आहेत.

IAS ची नोकरी सोडून upsc चे क्लास चालवणारे विकास दिव्यकीर्ती (Vikas Divyakirti) यांनी ब्रेकअप (breakup) विषयी आपले मत स्पष्ट केले आहे. दिव्यकीर्ती यांनी ब्रेकअप विषयी सांगितलेले मत जाणून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. दिव्यकीर्ती यांच्या मते, आयुष्यामध्ये तीन-चार ब्रेकअप होणे फार आवश्यक आहे. ब्रेकअप झाल्यामुळे नात्याविषयी गंभीरता येते.

एका मुलाखतीमध्ये बोलताना दिव्यकीर्ती यांनी लग्नापूर्वी ब्रेकअप व्हायला हवे असे सांगितले आहे. तुमच्यापैकी अनेकांना हे वाचून धक्का बसू शकतो. मात्र लग्नापूर्वी ब्रेकअप का व्हायला हवे, याविषयी त्यांनी आपलं स्पष्टीकरण देखील दिले आहे. जर तुम्हाला वैवाहिक जीवनात प्रचंड सुख, आनंद आणि दीर्घकाळ पार्टनरची सोबत टिकवायची असेल, तर लग्नापूर्वी दोन चार ब्रेकअप होणे फार आवश्यक असल्याचं म्हटले आहे.

लग्नापूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर, नात्याचे गांभीर्य लक्षात येते. नातं टिकवण्यासाठी काय आवश्यक आहे? या गोष्टी तुम्हाला समजतात. ज्या गोष्टींमुळे, चुकांमुळे आपला ब्रेकअप झाला आहे, त्या चुका तुम्ही लग्नानंतर करत नाही. किंवा आपल्याकडून त्याच चुका होऊ नयेत याची खबरदारी घेता.

ब्रेकअप झाल्यामुळे मॅच्युरिटी वाढते. ब्रेकअप झाल्यानंतर, माणूस भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनतो. नात्यांमध्ये संवादाचे महत्त्व देखील ब्रेकअप झाल्यामुळेच समजते. असं त्याचं म्हणणं आहे. ब्रेकअपच्या वेदनेमुळे तुम्हाला भावनांची कदर होते. याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून ब्रेकअप करा असा नाही, असंही ते म्हणाले. IND vs NZ: उद्या न्युझीलंड विरुद्ध अशी असेल भारताची प्लेइंग 11; शार्दुल बाहेर, तर हे दोन खेळाडू आत..

हे देखील वाचा

Acharya Chanakya Niti: लग्नानंतर नशीब पालटायचं असेल तर याच महिलेशी करा लग्न; अन्यथा उध्वस्तापासून कोणीच वाचवू शकणार नाही..

Hardik Pandya ruled out: दुखापतीमुळे हार्दिक पांड्या बाहेर; न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात संघात होणार दोन बदल..

RRC SECR Recruitment 2023 : रेल्वेत नोकरीची संधी! पदवीधरांसह 10/12 उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी..

Virat Kohli century: ..म्हणून विराट करणार नव्हता शतक, केएल राहुलच्या त्या दोन वाक्यात विराटचे मन फिरले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.