NTPC Recruitment 2023: या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
NTPC Recruitment 2023: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. यासाठी इंजिनीअरिंग उमेदवार अर्ज करू शकतात. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एक्सिक्युटीव्ह ट्रेनी या पदांकरिता 495 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National thermal Power corporation limited) अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी 495 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर.
रिक्त जागांच्या तपशील आणि शैक्षणिक पात्रता
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी इलेक्ट्रिकल या पदासाठी एकूण 120 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मेकॅनिकल या पदासाठी 200 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन या पदासाठी 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
मायनिंग या पदासाठी 65 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदांनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता देखील निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता विषयी सांगायचं उमेदवार हा 60 टक्के गुणांसह त्या त्या विषयांमध्ये इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. सोबतच GATE 2023 देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा/ नोकरीचे ठिकाण/ परीक्षा फी
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा असेल. तर ओबीसी उमेदवारांसाठी 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा असेल. एसी आणि एसटी उमेदवारांसाठी या वयोमर्यादित पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे.
खुला प्रवर्ग ओबीसी त्याचबरोबर ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी तीनशे रुपये परीक्षा फी असेल तर महिला माजी सैनिक आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. निवड करण्यात येणारे उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करावी लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज
६ ऑक्टोबर पासून उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर 20 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना शेवटची मुदत दिली गेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.ntpc.co.in/ असं सर्च करायचं आहे. त्यांनतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php
हे देखील वाचा Dates benefits: पुरुष महिला दोघांसाठीही खजूर आहे वरदान; अशा प्रकारे खा, त्यासाठी मिळेल भरपूर ताकद..
AUS vs SL: अंपायरने LBW आऊट दिले, अन् डेव्हिड वॉर्नरने हासडली शिवी; व्हिडिओही झाला व्हायरल..
Flipkart sale: दमदार कॅमेरा, 8GB रॅम असणारे हे चार भन्नाट स्मार्टफोन Flipkart वर मिळतायत फक्त..
Saif Ali Khan: ..म्हणून त्यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या दोन गोळ्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम