India vs Pakistan: भारतासाठी उद्याचा सामना सोप्पा नाही; ..तर पाकिस्तान भारताला लोळवण्याची दाट शक्यता..

0

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान (ind vs Pak) यांच्यामधील बहुप्रतीक्षेत असणारा सामना उद्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर (narendra modi cricket ground) खेळवला जाणार आहे. एक लाख तीस हजार कॅपॅसिटी असणारे हे मैदान पूर्ण क्षमतेने भरले जाणार आहे. एक लाख तीस हजार तिकिटांची त्यांची विक्री देखील झाली असल्याची माहिती आहे. उद्या भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोनच प्रतिस्पर्धी संघांमध्ये थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना उद्या दोन वाजल्या पासून सुरू होईल.

या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघानी सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, क्रिकेट चाहत्यांना अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. गेल्या काही आयसीसी सामन्यात पाकिस्तान संघ भारतीय संघावर वरचढ ठरला आहे. मात्र भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने हा सामना फारच रोमांचक होण्याची शक्यता आहे.

सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाल्नंयातर, पाकिस्तान संघांनी देखील धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने 344 धावांचा पाठलाग करत दमदार विजय संपादन केला होता. 37 धावांत दोन बाद अशा बिकट परिस्थितीतून पाकिस्तान संघाच्या मधल्या फळीने हा सामना आपल्या बाजूने खेचला. आणि विजय मिळवला.

पाकिस्तान संघाची गोलंदाजी ही चिंतेची बाब असली तरी,शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ हे दोन गोलंदाज कधीही आपल्या फॉर्ममध्ये येऊ शकतात. लेप्ट आर्म स्पेसर शाहीन आफ्रिदीने जर भारताच्या सलामीवीरांना आपल्या जाळ्यात ओढण्यात यश मिळवले तर भारतीय संघ बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षापासून भारतीय सलामीवीरांना लेप्ट आर्म स्पेसरने आत येणाऱ्या चेंडूवर अनेकदा बाद केलं आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात देखील लेफ्ट आर्म स्पेसर मिचेल स्टार्कने ईशान किशनला बाद केले होते. रोहित शर्माची देखील हीच डोखेदुःखी आहे. आतमध्ये येणाऱ्या चेंडूवर तो सपशेल अपयशी ठरला आहे. आतमध्ये येणाऱ्या चेंडू टाकून भारतीय सलामीवीरांना पुन्हा एकदा पाकिस्तान गोलंदाज आपल्या जाळ्यात ओढू शकतात.

अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असणार आहे. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 270/80 धावा उभा केल्या. आणि भारतीय सलामीवीरांना स्वस्तात तंबूत पाठवण्यात पाकिस्तान गोलंदाजांना यश आलं. तर हा सामना पाकिस्तान जिंकण्याची दाट शक्यता आहे. सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर, भारताची मधली फळी डाव सावरू शकेल, हे ठामपणे सांगता येत नाही. खास करून विराट कोहलीवर या सामन्याची संपूर्ण मदार असणार आहे. मिडल ऑर्डरमध्ये जर विराट अपयशी ठरला, तर मात्र भारतीय संघाचा पराभव निश्चित मानला जात आहे.

हे देखील वाचा ODI World Cup 2023: या दोन संघांना रोखणं अवघड; world Cup 2023 च्या फायनलचे प्रबळ दावेदार..

ICC World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचे World Cup 2023 मधील आव्हान संपुष्टात? जाणून घ्या सेमीफायनलचं गणित..

IND vs PAK: उद्या पाकिस्तान विरुद्ध Shubman Gill खेळणार? टीम मॅनेजमेंटने केले स्पष्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.