IND vs ENG Warm up match: उद्या तिघांपैकी जो चांगला खेळेल त्याला संधी; रोहितने उघड केला इंग्लंड विरुद्ध सराव सामन्याचा प्लॅन..

0

IND vs ENG Warm up match: भारतीय संघाने काल आपला अंतिम वर्ल्ड कप (World Cup 2023) संघ जाहीर केला. दुखापतीमुळे या विश्वचषकाला अक्षर पटेल (Axar Patel) मुकला आहे. अक्षर पटेलच्या जागेवर ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनला (ravichandran Ashwin) संधी देण्यात आली आहे. काल अधिकृतरित्या १५ सदस्यांचा संघ जाहीर झाल्यानंतर, वर्ल्डकप संघात प्लेइंग11 मध्ये कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे देखील आता स्पष्ट झालं आहे. मात्र उद्याच्या सराव सामन्यानंतर, हे अधिक स्पष्ट होणार आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील याविषयी संकेत दिले आहेत.

भारतीय संघाला उद्या इंग्लंड विरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. हा सराव सामना गुवाहाटी मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामना असल्यामुळे भारताच्या प्रत्येक फलंदाजाला उद्या फलंदाजी करता येणार आहे. याशिवाय प्रत्येक गोलंदाजाला देखील गोलंदाजीचा सराव या सामन्यात करता येणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत.

भारत आणि इंग्लंड हे दोन संघ विश्वचषक 2023 मध्ये प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता या दोन्ही संघांमध्ये उद्या सराव सामना होईल. एकंदरीत उद्याच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंची ओळख होणार आहे. गेल्या काही वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचा संघ सातत्याने दमदार खेळाचे प्रदर्शन करत आला आहे.

भारतीय संघ मात्र मधल्या फळीच्या फलंदाजाच्या कामगिरीमुळे अडचणी सापडला आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर भारतीय संघ अद्याप सेटल झालेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भारताच्या मधल्या फळीने चांगली कामगिरी केली. मात्र धावांचा पाठलाग करत असताना अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दबावांमध्ये पुन्हा एकदा मधली फळी कोलमडली.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ईशान किशन (ishan Kishan) केएल राहुल (kl Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे चार फलंदाज भारताच्या प्लेइंग इलेव्हनच्या रेसमध्ये आहेत. या चार खेळाडूंपैकी भारताच्या वर्ल्ड कप प्लेइंन इलेव्हनमध्ये केवळ दोनच खेळाडूंना संधी मिळणार आहे. यापैकी विकेट कीपर फलंदाज म्हणून केएल राहुलचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

राहूलला विकेटकीपर फलंदाज म्हणून, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी टीम मॅनेजमेंट विचार करत आहे. उरलेल्या एका जागेसाठी तीन फलंदाजामध्ये चुरस आहे. उद्या सूर्यकुमार यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर या तिघांपैकी जो दमदार खेळ करेल, त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात येईल.

हे देखील वाचा Asian Games 2023: भारत चीनमध्ये दाखल! सुवर्णपदकासाठी किती सामने जिंकावे लागणार? लाइव्ह सामना कुठे पाहाल? वाचा सविस्तर..

IND vs AUS World Cup Match: एकच पराभव आणि पुन्हा त्याच समस्या उजागर; ते तिन्हीं फलंदाज अपयशी ठरल्याने आता World Cup प्लेइंग 11 चा रस्ता झाला साफ..

Flipkart Big Billion Days 2023: Flipkart च्या सेलमध्ये ऑफरचा धुमाकूळ; जाणून घ्या सेल विषयी सविस्तर..

Acharya Chanakya Niti: या तीन ठीकणी पैसे खर्चास कंजुषी केल्यास लक्ष्मी राहते नेहमी नाराज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.