Asian Games 2023: भारत चीनमध्ये दाखल! सुवर्णपदकासाठी किती सामने जिंकावे लागणार? लाइव्ह सामना कुठे पाहाल? वाचा सविस्तर..
Asian Games 2023: एकीकडे वर्ल्ड कपची (World Cup 2023) जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे भारतीय संघ (indian team). आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) स्पर्धा खेळण्यासाठी चीनमध्ये (China) पोहचला आहे. भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आता पुरुषांचा संघ देखील सज्ज झाला आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. ऋतुराज गायकवाडने पहिल्या सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन केल्यानंतर, त्याच्याकडून आता भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा लागली आहे. आयपीएल मध्ये दमदार कामगिरी केलेल्या अनेक नवीन खेळाडूंना एशियन गेम्स स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. भारतीय संघात संधी मिळण्याचे दृष्टीने स्पर्धेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर असल्याने, भारतीय संघाला क्वार्टर फायनलमध्ये संधी मिळाली आहे. भारता शिवाय फायनलमध्ये बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे चार संघ देखील क्वार्टर फायनलमध्ये खेळणार आहेत. भारताचा पहिला सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल.
तीन ऑक्टोंबरला भारताचा पहिला क्वार्टर फायनल सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल. क्रिकेट चाहत्यांना हा सामना सोनी लिव्हवर पाहता येईल. याशिवाय सोनी स्पोर्ट 5 सोनी टेन3 या टीव्ही चॅनलवरून थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
Asian Games या स्पर्धेचे भाग केवळ आशिया खंडातील संघांना होता आले आले. त्यामुळे महिलांप्रमाणे भारताचा पुरुष संघ देखील या स्पर्धेत सर्वाधिक बलशाही आहे. एकीकडे पाच ऑक्टोबरला भारतामध्ये विश्वचषकाला सुरुवात होईल. तर दुसरीकडे भारताचा दुसरा क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकण्यासाठी खेळताना दिसेल.
असा आहे भारतीय संघ
ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रिंकू सिंग शिवम मावी, अर्शदीप सिंग, जितेश शर्मा, राहुल त्रिपाठी, यशस्वी जयस्वाल, वाशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिष्णोई, तिलक वर्मा, प्रभसिमरन सिंग, मुकेश कुमार, आवेश खान
हे देखील वाचा Flipkart Big Billion Days 2023: Flipkart च्या सेलमध्ये ऑफरचा धुमाकूळ; जाणून घ्या सेल विषयी सविस्तर..
Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..
Acharya Chanakya Niti: या तीन ठीकणी पैसे खर्चास कंजुषी केल्यास लक्ष्मी राहते नेहमी नाराज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम