IND vs AUS World Cup Match: एकच पराभव आणि पुन्हा त्याच समस्या उजागर; ते तिन्हीं फलंदाज अपयशी ठरल्याने आता World Cup प्लेइंग 11 चा रस्ता झाला साफ..
IND vs AUS World Cup Match: वर्ल्ड कप स्पर्धेचे (world Cup 2023) बिगुल वाजले आहे. भारतीय संघाला पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 तारखेला चेन्नईच्या मैदानावर खेळायचा आहे. नुकत्याच पार पडलेल्या तीन एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केलं. मात्र अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा त्याच समस्या उजागर झाल्याने भारतीय संघ वर्ल्ड कपपूर्वी अडचणी सापडला आहे. (Australia beat India 3rd ODI)
गेल्या दोन वर्षापासून भारतीय (middle order) संघाची मधली फळी सातत्याने अपयशी ठरली आहे. खासकरून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मधल्या क्रमांकाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत. भारतीय संघासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे, महत्वाच्या सामन्यात या समस्येचे अद्यापही निवारण करता आले नाही.
काल राजकोटच्या सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया संघाने 351 धावांचे आव्हान उभं केलं. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली भारतीय फलंदाजी हे आव्हान पार करेल, असं वाटत होतं. मात्र चांगल्या सुरुवातीनंतर देखील भारताच्या मधल्या फळीचे फलंदाज अपयशी ठरले. श्रेयस अय्यर (shreyas Iyer) केएल राहुल (KL Rahul) सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) जबरदस्त फॉर्ममध्ये आले असं वाटत होतं. मात्र दबावामध्ये हे तिघेही पुन्हा एकदा एक्सपोज झाले.
गेल्या काही वर्षापासून दबावमध्ये मधली फळी अनेकदा कोलमडताना पाहायला मिळाली आहे. काल पुन्हा एकदा याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. वर्ल्ड कप तोंडासमोर आला असताना भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा एक्स्पोज झाल्याने, आता भारतीय संघाचा कॉन्फिडन्स डाउन झाला आहे.
भारतीय संघाला विश्वचषकाचा आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईच्या मैदानावर खेळायचा आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची मधली फळी पुन्हा अपयशी ठरली. त्यामुळे आता वर्ल्डकपचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला आहे.
भारतीय फलंदाज स्पिनर गोलंदाजांना खेळण्यात अपयशी ठरले आहेत. स्पिनर गोलंदाजांसाठी अनुकूल असणाऱ्या चेन्नईच्या चेपॉक (Chepauk) खेळपट्टीवर भारताचा पहिला सामना होणार आहे. पाटा विकेट असणाऱ्या खेळपट्टीवर मॅक्सवेलने (Glenn Maxwell) भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढलं. चेन्नईच्या चेपॉक (Chepauk) खेळपट्टीवर याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.
श्रेयस अय्यर,केएल राहुल, सूर्यकुमार यादव, काल अपयशी ठरले. सुरुवातीच्या फलंदाज अपयशी ठरल्यानंतर, मधल्या क्रमांकाच्या फलंदाजाची जबाबदारी अधिक वाढते. साहजिकच मधल्या क्रमांकाच्या फलंदाजावर दबाव आला तरी देखील चांगल्या खेळाची अपेक्षा असते. मात्र तिघांनाही दबावामध्ये अपेक्षेप्रमाणे खेळी करता आली नाही.
भारतीय संघात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर चार खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. या चार पैकी वर्ल्डकपमध्ये कोणत्या दोन खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार, हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता. मात्र काल झालेल्या सामन्यानंतर, आता हे चित्र स्पष्ट झालं आहे. विश्वचषकामधील पहिल्या सामन्यात केएल राहुल आणि ईशान किशनला संधी देण्यात येणार आहे. (Ishan Kishan kl Rahul will be the Indian squad for first match in world cup 2023)
सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यरच्या अगोदर ईशान किशनला संधी देण्यात येणार आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र दबावामध्ये ईशान किशनने 82 धावांची बहारदार खेळी साकारली होती. याच कारणामुळे त्याला आता सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर अगोदर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात येणार आहे.
हे देखील वाचा IND vs AUS Rajkot ODI: श्रेयस अय्यरच्या शतकानंतर तीन फलंदाज अडचणीत; राहुल द्रविड रोहित शर्मानेही दिले हे संकेत..
Redmi Note 13: 100MP कॅमेरा असलेला Redmi चा तगडा फोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम