राज्यपालांच्या वर्तणुकीवर पवारांनी लिहिले मोदींना पत्र

0

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बार रेस्‍टॉरंट चालू आणि देव कुलप बंद का? अशा आशयाचे पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांना कोशारी यांनी तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आहात असेही या पत्रात म्हटलं होतं

कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तुम्ही माझा जो हिंदुत्वाचा उल्लेख केला आहे ते योग्यच आहे. परंतु मला तुमच्या हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता या प्रकरणात शरद पवार यांनी उडी घेतली आहे. शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहित, मला राज्यपालांच्या बोलण्याचा खेद वाटतो,असं त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सध्या आपण कोरोनाशी लढत आहोत. महाराष्ट्रमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्या सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळणे शक्य नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील जनतेला सोशल डिस्टंसिंग चे महत्त्व, शिक्षण दिले जात आहे. जर धार्मिक स्थळ चालू केली तर सोशल डिस्टंसिंग पाळणे शक्य होणार नाही. असं पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रामुळे मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी लिहिलेले हे पत्र एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला लिहल्यासारखे वाटत असल्याचे, पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

या सगळ्या प्रकरणाचा घटनाक्रम पाहिला तर, मुख्यमंत्र्यांना राज्यपालांच्या पत्राला दिलेले उत्तर हे,सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे शिवाय काही उपायच नव्हता. असेही पवार म्हणाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.