मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यपालांना जोरदार प्रतिउत्तर
महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी या सरकारच्या धोरणाविरोधात अनेकदा विरोधी भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी बार,रेस्टॉरंट सुरु केली यावर देखील राज्यपालांनी टिपणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोशारी यांनी एक पत्र व्यवहार करत तुम्ही बार,रेस्टॉरंट चालू केली. परंतु देव कुलूप बंद का? असा सवाल विचारला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कोशारी यांनी हिंदुत्त्वाची आठवणही करून दिली.
राज्यपाल यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही पत्र लिहून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्याचबरोबर ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला,राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत स्वागत करणे,हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. असे पडखर मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले.
केवळ धर्मस्थळे उघडणे हे हिंदुत्व आणि धर्मस्थळ नउघडणे हे सेक्युलर. असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतली,त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा सेक्युलॅरिझम आहे. तो आपल्याला मान्य नाही का? असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल यांना लगावला.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम