Green Chilli: बाजारातून आणल्यानंतर हिरवी मिरची लगेच सुकते, लाल पडते? मग वापरा ही स्ट्रिक, मिरची राहील हिरवीगार..
Green Chilli: कोणतीही भाजी किंवा पदार्थ बनवताना हिरवी मिरची जवळपास सर्वच जण वापरतात. हिरवी मिरची (Green Chilli) पौष्टिक असल्याने भारतीयांच्या किचनमध्ये हिरवी मिरची असतेच असते. मात्र हिरवी मिरची दोन-तीन दिवसात सुकून लाल देखील पडते. अनेकांपुढे ही मोठी समस्या असते. तुम्हाला देखील ही समस्या असेल, तर चिंता करण्याची आवश्यकता नाही.
बाजारामधून आणलेली हिरवी मिरची दहा-बारा दिवस आहे अशीच ठेवायचे असेल, तरीदेखील तुम्हाला हे सहज शक्य आहे. बाजारातून आणलेली हिरवी मिरची तशीच ठेवण्यासाठी तुम्हाला एका स्ट्रीकचा वापर करायचा आहे. वाचा सविस्तर.
सर्वसामान्य कुटुंबात रोजच्या रोज भाजी खरेदी करणे शक्य नसतं. सर्वसामान्य लोकांना कामाचा खूप मोठा व्याप असतो. त्यामुळे आठवडाभराची भाजी एकदाच खरेदी केली जाते. शिवाय जास्तीचा भाजीपाला खरेदी केल्याने पैशाची देखील बचत होते. असं असलं तरी भाजीपाला आठवडाभर आहे, असाच राहत नाही. ही देखील मोठी समस्या असते.
सर्वसामान्यांच्या प्रत्येक कुटुंबामध्ये हिरवी मिरची खूप महत्वाचा घटक आहे. त्यामुळे बरेच दिवस हिरवी मिरची हिरवीच राहावी असा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र हिरवी मिरची आहे कशी ठेवायची, हे अनेकांना माहीत नसल्याने कोणी फारसे याकडे लक्ष देत नाही. मात्र आम्ही तुम्हाला हिरवी मिरची आठवडाभर हिरवी ठेवण्याची स्ट्रिक सांगणार आहोत.
बाजारातून हिरवी मिरची आणल्यानंतर, तुम्ही एका टीशू पेपर (tissue paper) मध्ये मिरची व्यवस्थितरित्या पॅक करून ठेवा. टिशू पेपरमध्ये पॅक केलेली मिरची तुम्ही एका चैन असलेल्या बॅगेत व्यवस्थित ठेवून द्या. बॅग मध्ये कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजन जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्या.
चैन असलेल्या बॅगेव्यतिरीक्त तुम्ही टिशू पेपरममध्ये हिरवी मिरची व्यवस्थित गुंडाळून एका बंद डब्यामध्ये देखील ठेवू शकता. ज्यामुळे देखील हिरवी मिरची किमान आठवडा आहे अशीच राहते. याशिवाय तुम्ही हिरवी मिरची फ्रिजमध्ये देखील ठेऊ शकता. मात्र फ्रिजमध्ये ठेवताना देखील तुम्ही टीशू पेपरमध्ये गुंडाळून बंद डब्यातच ठेवा. जेणेकरून मिरची आणखी जास्त दिवस हिरवी राहील.
हे देखील वाचा AFG vs SL: थोडक्यात पराभव झाला आणि राशिद खान रडू लागला; पाहा शेवटच्या दोन मिनिटात कसा खेळ पालटला..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम