AFG vs SL: थोडक्यात पराभव झाला आणि राशिद खान रडू लागला; पाहा शेवटच्या दोन मिनिटात कसा खेळ पालटला..
AFG vs SL: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तान (Sri Lanka beat Afghanistan) आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. अफगाणिस्तान संघाचे सुपर 4 मध्ये जाण्याची संधी थोडक्यात हुकली. शेवटच्या दोन मिनिटांत राशिद खान (Rashid Khan) नॉन स्ट्राइकवर गेला. आणि सगळा खेळच पालटला. अफगाणिस्तानने जवळजवळ सुपर 4 चे तिकीट निश्चित केले होते. मात्र रनरेटचे गणित अफगाणिस्तान संघाच्या लक्षात न आल्याने, पराभव पत्करावा लागला. पराभव झाल्यानंतर भर मैदानात राशिद खान ढसाढसा रडला.
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघाचा मोठा पराभव झाला. या पराभवामुळे अफगाणिस्तान संघाचे रन रेट फारच खराब झाले होते. ज्यामुळे त्यांना सुपर4 मध्ये जाण्यासाठी श्रीलंके विरुद्ध मोठा विजय आवश्यक होता. बांगलादेश संघाने अफगाणिस्तान विरुद्ध मोठा विजय मिळवल्याने, ग्रुप बी मधून बांगलादेश संघ सुपर4 मध्ये यापूर्वीच पोहचला होता. लढत होती ती श्रीलंका आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये.
श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश समोर मोठे आव्हान उभा केलं. श्रीलंका संघाने उभा केलेले 291 धावांचे आव्हान अफगाणिस्तान संघाला 37.1 षटकात पूर्ण करायचे होते. अफगाणिस्तान अफगाणिस्तान संघ हे आव्हान 37 षटकात सहज पूर्ण करेल, असे चित्र होते. मात्र अखेरच्या दोन मिनिटांत पूर्ण खेळ बदलला.
37 व्या शतकात अफगाणिस्तान संघाला सुपर4 मध्ये पोहोचण्यासाठी सोळा धावांची आवश्यकता होती. या षटकात राशीत खाने तीन खणखणीत चौकारही ठोकले. एका चेंडूत तीन धावांच्या आवश्यकता असताना, मुजीब उर रहमान बाद झाला. त्यांनतर एक चेंडू चार किंवा सहा धावांची आवश्यकता होती. मात्र फारुकी ही तीन चेंडू खेळून बाद झाला. राशीद खान नॉन स्ट्राईकवरच राहिला. आणि अफगाणिस्तान संघाने दोन धावांनी सामना गमावला. त्यांनतर राशीद खान नॉन स्ट्राईकवर बसून रडला.
सोशल मीडियावर राशिद खानचा व्हिडिओ देखील तुफान वायरल झाला आहे. राशिद खान बरोबर ड्रेसिंग रूम मधील काही खेळाडूंनाही पराभवामुळे आपल्या आसवांना रोखता आलं नाही. सुपर फोरमध्ये आता भारत, पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश हे चार संघ पोहोचले आहेत. प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध सामना खेळायचा आहे. चार सांघांपैकी ज्या दोन संघांना अधिक गुण असतील, त्या दोघांमध्ये आशिया कप स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे.
I cried because I was so sad💔😕. Rashid Khan gave it everything he had, but in the end, it was in vain.💔😞#AsiaCup2023 #AFGvSL pic.twitter.com/MxsONoxQ2X
— 🃏♔ 𝒜ℒℒℰℰ𝒴 ♡.🎭 (@Allleey31) September 5, 2023
सुपर 4 चे सामने..
आज पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश
9 सप्टेंबरला श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश दुसरा सामना.
10 सप्टेंबर भारत विरुद्ध पाकिस्तान तिसरा सामना
12 सप्टेंबर भारत विरुद्ध श्रीलंका चौथा सामना.
14 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका पाचवा सामना
15 सप्टेंबर भारत विरुद्ध बांग्लादेश सहावा सामना
फायनल सामना 17 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.
हे देखील वाचा India Squad For ODI World Cup 2023: या तीन खेळाडूंना मिळाला डच्चू; असा आहे वर्ल्ड कपसाठी भारताचा पंधरा सदस्यीय संघ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम