IND vs PAK Asia Cup: पाकिस्तान विरुद्ध रोहितची विचित्र खेळी भोवणार; ..म्हणून इशानसाठी शुभमन, विराटचा जाणार बळी..
IND vs PAK Asia Cup: वर्ल्ड कपची (world Cup 2023) तयारी म्हणून बहुचर्चित असणारी आशिया चषक स्पर्धा कालपासून सुरू झाली आहे. नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यामध्ये या स्पर्धेचा पहिला सामना काल खेळवण्यात आला. ज्यात पाकिस्तान संघाने दमदार खेळ सादर केला. पाकिस्तान संघाने हा सामना तब्बल 238 धावांनी जिंकत या स्पर्धेत दमदार सुरुवात केली. आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा लागलीय ती दोन सप्टेंबरला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याची.
केएल राहुल दुखापतीमुळे आशिया स्पर्धेतून बाहेर गेल्याने, भारतीय संघासमोर आणखीन पेच निर्माण झाला आहे. प्लेइंग इलेव्हन जवळपास स्पष्ट असली तरी कोणता फलंदाज कोणत्या जागेवर खेळणार? याविषयी मोठी संभ्रमता आहे. भारताचा पूर्व कोच रवी शास्त्रीने विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. यावर आता टीम मॅनेजमेंटने गंभीर विचार केल्याची माहिती समजते.
केएल राहुलमुळे पाचव्या क्रमांकाची समस्या निर्माण झाली आहे. राहुलच्या जागी विकेटकीपर फलंदाज म्हणून ईशान किशनला संधी मिळणार असली, तरी ईशान किशनची कामगिरी मिडल ऑर्डरमध्ये फारच निराशाजनक राहिली आहे. परंतु ईशान किशनने सलामीला दमदार खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे, रोहित आणि टीम मॅनेजमेंट ईशान किशनला सलामीला संधी देऊ इच्छित आहे.
जर ईशान किशनला सलामीवीर म्हणून संधी दिली, तर शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल. जर शुभमन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, तर विराट कोहलीला अर्थात चौथ्या क्रमांकावर खेळावे लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्या शक्यतांवर टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्माने चर्चा केली आहे.
ईशान किशनला सलामीला खेळवण्यासाठी विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या क्रमांकात बदल करणं फायद्याचं ठरणार का मोठा प्रश्न आहे. ईशान किशनला सलामीला खेळवल्याने तीन-तीन क्रमांकात बदल होणार आहेत. जी भारतीय संघाची मोठी अडचण करू शकते. चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर फिट झाला असला तरी विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळला, तर श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे.
दोन सप्टेंबरला पाकिस्तानी विरुद्ध होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत आपली रणनीती कशाप्रकारे आखून मैदानात उतरतो? हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? कोणता खेळाडू कोणत्या क्रमांकावर खेळणार हे अद्याप स्पष्ट झाला नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट आपला अंतिम अकरा संघ कशाप्रकारे मैदानात उतरतो? आणि कसा परफॉर्मन्स करतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा IND vs PAK: भारताला नमवण्यासाठी पाकिस्तानची तयारी पूर्ण; भारत किती तयार? असा आहे पहिल्या सामन्याचा भारतीय संघ..
IOCL Recruitment 2023: या उमेदवारांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम