IND vs PAK: भारताला नमवण्यासाठी पाकिस्तानची तयारी पूर्ण; भारत किती तयार? असा आहे पहिल्या सामन्याचा भारतीय संघ..

0

IND vs PAK: कालपासून आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेला सुरुवात झाली असून, पाकिस्तानने नेपाळ विरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजय संपादन केला. (Pakistan beat Nepal) पाकिस्तानने पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात दमदार प्रदर्शन करत भारतीय संघाला धडकी भरवली आहे. गेल्या काही सामन्यात पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला वरचढ ठरला आहे. आशिया कप स्पर्धेतला तिसरा सामना 2 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. (IND vs PAK 2nd September live streaming)

2022 मध्ये झालेली आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची सुमार कामगिरी राहिली होती. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघाकडून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2013 पासून भारतीय संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघावर कमालीचा दबाव असणार आहे. शिवाय गेल्या काही सामन्यांमध्ये पाकिस्तानने भारताची दमछाक केली आहे.

नेपाळ विरुद्ध खेळलेल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने आपला जलवा दाखवत आशिया चषक स्पर्धेत दमदार सुरुवात केली. साहजिक त्यामुळे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास गगनात आहे. दुसरीकडे भारतीय संघ अद्याप सेटल झाला नसल्याने, दोन सप्टेंबरला होणारा सामना भारतासाठी खूप मोठं आव्हान असणार आहे. दुखापतीमुळे केएल राहुल (kl Rahul) आशिया चषकातून बाहेर गेला असल्याने, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचव्या क्रमांकावर ईशान किशन फलंदाजीसाठी येऊ शकतो.

केएल राहुलच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये ईशान किशनला (ishan kishan) संधी मिळू शकते. मात्र ईशान किशनला मिडल ऑर्डरमध्ये अद्याप सूर पकडता आलेला नाही. दुसरीकडे श्रेयस अय्यर (shreyas Iyer) देखील अनेक महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन करत आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर तो देखील कशी कामगिरी करतो, याकडेही लक्ष असणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून लेप्टआर्म स्पेसर्स भारताच्या प्रमुख फलंदाजाची डोकेदुखी ठरला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात देखील भारतासमोर हीच समस्या असणार आहे. भारताचे सलामीवीर पाकिस्तान जलदगती गोलंदाजांचा कसा सामना करणार? भारताची मधली फळी परफॉर्मन्स करणार का? असे असंख्य प्रश्न भारतासमोर असल्याने, पाकिस्तान संघ या सामन्यात खूप सरस आहे.

नेपाळ विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजाने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. पाकिस्तान संघाने 50 षटकात 342 धावा फटकवल्या. यामध्ये कर्णधार बाबर आजमने 151 धावांची खेळी केली. तर मिडल ऑर्डरमध्ये इफ्तिकार अहमद याने केवळ 71 चेंडूत 109 धावांची खेळी साकारली. पाकिस्तान संघाने गोलंदाजीतही कमाल करत, नेपाळच्या संघाला केवळ 104 धावांत गारद केले.

असा असेल पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमहरा, मोहम्मद सिराज

हे देखील वाचा IOCL Recruitment 2023: या उमेदवारांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या डिटेल्स..

Asia Cup 2023 IND vs PAK: ..म्हणून आशिया चषकात हे तीन खेळाडू अपयशी ठरले तर वर्ल्ड कपचा पत्ता होणार कट; BCCI चा प्लॅन तयार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.