ATM व्यतिरिक्त SBI ची सर्व सेवा ठप्प!

0

44 कोटी ग्राहक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाईन सेवा गेल्या तासाभरापासून बंद असल्याने कोट्यावधी लोकांना याचा फटका बसला आहे.

या घटनेविषयीची माहीत खुद्द स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करून दिली आहे. या ट्विटद्वारे बँकेने म्हटले आहे की, कनेक्टिविटी नसल्याने आमच्या कोअर बँकिंग सेवा ग्राहकांना वापरता येणार नाही. परंतु लवकरच सामान्य सेवा सुरू केली जाईल. आम्ही ग्राहकांना विनंती करतो त्यांनी आमच्या सोबत रहावे.

इतर सेवा बंद असली तरी एटीएम आणि पीओएस सेवा सुरळीत चालू आहे,असंही स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.