Tilak Varma: तिलक वर्माच्या कामगिरीवर रोहितचे मोठे विधान; एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचे संकेत..
Tilak Varma: आगामी विश्वचषकाच्या (ODI World Cup 2023) तयारीसाठी भारतीय संघ (indian team) चांगलाच लागला आहे. कसोटी मालिकेनंतर एकदिवसीयमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) नवीन खेळाडूंना संधी देत, विश्वचषकाच्या तयारीचे संकेत देखील दिले. सध्या भारतीय संघ वेस्टइंडीज विरुद्ध 5 T 20 सामन्याची मालिका खेळत आहे. (India vs West Indies T20 series) टी-ट्वेंटी मालिकेमध्ये (Tilak Varma) केलेल्या दमदार कामगिरीचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशातच रोहित शर्माचे एक विधान समोर आले आहे, ज्याची चर्चा जोरदार आहेत. (Rohit Sharma on Tilak Verma)
पाच ऑक्टोंबर पासून 19 नोव्हेंबर या काळामध्ये भारतात विश्वचषक पार पडणार आहे. 2023 चा विश्वचषक भारतात होणार असल्याने, भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळे या विश्वचषकाची जोरदार चर्चा सध्या रंगल्याच पाहायला मिळत आहे. विश्वचषकाविषयी अनेक दिग्गज आपले मत नोंदवताना देखील दिसतात. विश्वचषकाची चर्चा रंगली असली, तरी भारतीय फलंदाजी अजूनही निश्चित झालेली नाही.
भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) यांनी देखील भारतीय संघामध्ये चौथा आणि पाचव्या क्रमांकाचा खेळाडू सेट झाला नसल्याने, भारतीय संघासाठी हा मोठा चिंतेचा विषय असल्याचं मत नोंदवले आहे. एकीकडे चौथ्या क्रमांकाची चर्चा होत असताना, दुसरीकडे रोहित शर्माने तिलक वर्माच्या केलेल्या कौतुकाचा थेट संबंध विश्वचषकातील सहभागा विषयी जोडला जात आहे.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना शर्मा म्हणाला, तिलक वर्मा सोबत मी आयपीएलमध्ये खूप खेळलो आहे. धावा करण्याची भूक त्याच्यामध्ये प्रामुख्याने जाणवते. त्याच्याशी बोलताना तो खूप परिपक्व खेळाडू असल्याचं मला जाणवतं. कधी आक्रमकपणा धारण करायचा, कोणता चेंडू सोडायचा, याविषयी त्याच्यामनात स्पष्टता असल्याचं दिसतं. रोहित शर्माने तिलक वर्माच्या केलेल्या कौतुकाच्या टाइमिंगचा संबंध आशिया चषक आणि वर्ल्ड कप संघामध्ये सहभागा विषयी जोडला जात आहे.
भारतीय संघात मधल्या फळीत एकही डावखुरा फलंदाज नाही. याशिवाय केएक राहुल (kl Rahul) श्रेयस अय्यर (shreyas Iyer) या दोन्हींच्या फॉर्म विषयी देखील मोठी संभ्रमता आहे. हे दोन्हीं खेळाडू बऱ्याच काळापासून भारतीय संघाचा भाग नाहीत, दुखापतीतून सावल्यानंतर हे खेळाडू कशी कामगिरी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
केएक राहुल श्रेयस अय्यर या दोघांचाही भारतीय संघात समावेश झाला नाही, तर चौथ्या क्रमांकासाठी आशिया कप (asia Cup) आणि विश्वचषकामध्ये (world Cup) देखील डावखुऱ्या तिलक वर्माची भारतीय संघात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सूर्यकुमार यादवच्या (Surya Kumar Yadav) अगोदर तिलक वर्माला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून भारतीय टीम मॅनेजमेंट पाहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुढच्या आठवड्यात अजित आगरकरच्या (Ajit agarkar) अध्यक्षतेखाली निवड समिती आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडणार असल्याची माहिती आहे. हा संघ कसा असेल, याविषयी अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
हे देखील वाचा ODI World Cup 2023: तिलक वर्माची वर्ल्ड कप संघात वर्णी; असा आहे 15 जणांचा संभाव्य ODI World Cup संघ..
Shravan Special: ..म्हणून श्रावणात मांसाहार करत नाहीत, ती तीन कारणे जाणून तुम्हीही लागलीच सोडाल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम