Shiv Thakare Daisy Shah: त्या एका कारणामुळे डेझी शाह आहे शिव ठाकरेच्या प्रेमात पागल; व्हिडिओमुळे झाला खुलासा..

0

Shiv Thakare Daisy Shah: शिव ठाकरे आणि डेझी शहा (Shiv Thakare and Daisy Shah) सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. मराठी बिग बॉस विनर, आणि हिंदी बिग बॉस रनरअप शिव ठाकरे गेल्या काही महिन्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. सध्या तो ‘खतरो के खिलाडी सीजन13 (khatron ke Khiladi season 13) मध्ये पार्टिसिपेट झाला आहे. त्याच्याबरोबर डेझी शाह देखील या रियालिटी शोचा भाग आहे.

शिव ठाकरे आणि डेझी शहा वेळ मिळाल्यानंतर, एकत्रितपणे रिल्स टाकत आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणी दोघेच फिरत आहेत. त्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काल पुन्हा एकदा एका कॉफी शॉपमध्ये या दोघांना स्पॉट करण्यात आल्याने, आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

दोघांनीही आपल्या नात्याविषयी खुलासा केला नसला तरी, डेझी शहा आणि शिव ठाकरे एकमेकांच्या प्रेमात वेढे असल्याची मिळाली आहे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच अधिकृतरित्या दोघेही आपल्या नात्याची घोषणा करणार असल्याची, माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डेझी शाह आणि शिव काल एका कॉफी शॉपमधून बाहेर येताना स्पॉट झाले. विशेष म्हणजे, छोट्या मुलांसोबत दोघांनी आनंदाने सेल्फी देखील काढला. आणि एकाच कार मधून निघून गेले.

शिव ठाकरे आणि डेझी शहा दोघांनीही एकाच कलरचा पोशाख परिधान केला होता. यामुळे देखील आता दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं शिक्कामोर्तब होत आहे. एका कार्यक्रमात बोलताना डेझी शाह शिव ठाकरेला जेंटलमेन म्हणाली होती. तो जमिनीशी जोडला गेला आहे. त्याचा साधा आणि सरळ स्वभाव अनेकांना भावतो. मी देखील त्याच्या या स्वभावाची फॅन आहे. अशी स्तुतिसुमने देखील तिने शिव ठाकरेवर उधळली होती.

आम्ही दोघे एकमेकांना डेट करतो अशा चर्चा रंगत असल्या तरी हे आम्ही लोकांवर आणि मीडियावर सोडलं आहे. आमची मैत्री घट्ट आहे. त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. जोपर्यंत आम्ही दोघे एकत्रितपणे आमच्या नात्याविषयी बोलत नाही, तोपर्यंत लोकांना काय समजायचं आहे, ते अमही लोकांवर आणि मीडियावर सोडलं आहे. असं देखील ती म्हणाली आहे. तिच्या या विधानामुळे देखील दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

अशी झाली भेट, मैत्री आणि..

डेझी शहाने ‘जय हो’ या चित्रपटामधून आपल्या बॉलीवूड करिअरला सुरुवात केली. तिच्या अपोजिट सलमान खान असल्याने, चित्रपट पडून देखील ती प्रकाशझोतात आली. शिव ठाकरेने आपल्या स्वतःच्या हिमतीवर बॉलीवूडमध्ये नाव कमावलं आहे. “खतरो के खिलाडी” सीजन 13 च्या सेटवर या दोघांची भेट झाली. या भेटीचे मैत्रीत रूपांतर झाले. दोघेही इंस्टाग्रामवर रील्स बनवू लागले.

लोकांना देखील ही जोडी प्रचंड आवडू लागल्याने, या दोघांमध्ये जवळीकता वाढल्याचे बोललं जातं. दोघांनी आपल्या डेटिंगवर अद्याप अधिकृतरित्या स्पष्टता केली नसती, तरी हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील वाचा IND vs WI 3rd T20I: अर्धशतक अपुरे राहिल्याने तिलक वर्माने हार्दिकसोबत हातही मिळवला नाही; पाहा व्हायरल व्हिडिओ..

IND vs WI 3rd T20I: अर्धशतक अपुरे राहिल्याने तिलक वर्माने हार्दिकसोबत हातही मिळवला नाही; पाहा व्हायरल व्हिडिओ..

Ileana DCruz Baby Boy: नवऱ्याविना इलियाना झाली आई; तुम्हालाही माहित नाही इलियानाच्या बाळाचा पिता? मग वाचा सविस्तर..

Lust Video Viral: तरुणीच्या सीटवर बसला, अन् भरलेल्या बसमध्येच हस्तमैथुन करू लागला; पाहा तो व्हिडिओ..

Dharmaveer 2: अखेर धर्मवीर 2 ची घोषणा; सीक्वेलमधून होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जयजयकार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.