Suryakumar Yadav: रोहित आणि राहुल सर मला म्हणाले..”; वनडे क्रिकेटचा खेळ जमत नाही; हे काय बोलून गेला सूर्या, पाहा व्हिडिओ..

0

Suryakumar Yadav: भारतीय संघाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तिसऱ्या T20 सामन्यात वेस्टइंडीज विरुद्ध दमदार खेळ करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पाच T-20 सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ 2-0 असा पिछाडीवर पडला होता. मात्र तिसऱ्या T-20 सामन्यात मालिका विजयाच्या निश्चयाने मैदानात उतरणाऱ्या वेस्ट इंडिज संघाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले.

तिसऱ्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (SuryaKumar Yadav man off the match) पोस्टमॅच प्रेझेंटेशनमध्ये सूर्यकुमार यादवला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्याने देखील दिलखुलास उत्तरे दिली. आपल्या एकदिवसीय क्रिकेट कामगिरीवर देखील त्याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देखील त्याने दिलखुलासपणे उत्तर दिले. ज्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होतेय.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये माझे आकडे खराब आहेत. हे मला मान्य करायला बिलकुलही लाज वाटत नसल्याचं विधान त्याने केलं. त्याच्या या विधानाची चर्चा तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत होत आहे. एकीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये आकडे खराब असले तरी, दुसरीकडे मात्र त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविडचे rahul dravid) कौतुक केले आहे.

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या दोघांनीही मला एकदिवसीय क्रिकेट विषयी स्पष्ट सांगितले आहे. तुझी आम्हाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये गरज पडणार आहे. 50 षटकामधील शेवटची 18,20 षटके खेळ शिल्लक असेल, तर तुला 45-50 चेंडू खेळायचे आहेत. असा संदेश मला कोच आणि कॅप्टन दोघांनीही दिला आहे.

सूर्यकुमार यादवने ज्याप्रमाणे टी-ट्वेंटी क्रिकेटला जुळवून घेतले आहे, त्याप्रमाणे तो एकदिवसीय क्रिकेटला जुळवून घेण्यात अपयशी ठरला आहे. चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादवला वन डे विश्वचषकासाठी प्रमुख दावेदार मानलं जात असलं तरी, त्याचे आकडे खराब असल्याने, टीम मॅनेजमेंट पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र सूर्यकुमार यादवच्या विधानामुळे विश्वचषकात अंतिम अकरामध्ये तो दिसेल, हे त्यानेच एकप्रकारे स्पष्ट केले आहे.

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 26 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. 26 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने केवळ 24.33 च्या सरासरीने 511 धावा काढल्या आहेत. ज्यामध्ये केवळ दोन अर्थशतकाचा समावेश आहे. 64 ही सूर्यकुमार यादवची एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च धावसंख्या आहे. जर टी ट्वेंटी विषयी बोलायचं झालं, तर त्याने 51 T-20 सामन्यात तब्बल 45.64 च्या सरासरीने 1780 धावा केल्या आहेत. ट्वेंटीमध्ये सूर्याने 14 अर्धशतके आणि तीन शतकेही ठोकण्याचा कारनामा केला आहे.

हे देखील वाचा IND vs WI 3rd T20: टीममेंट म्हणून पांड्या निघाला भिकारडा; हार्दिकच्या त्या कृत्यावर चाहत्यांचा संताप..

IND vs WI 3rd T20I: अर्धशतक अपुरे राहिल्याने तिलक वर्माने हार्दिकसोबत हातही मिळवला नाही; पाहा व्हायरल व्हिडिओ..

World Cup 2023 prediction: इंडिया नाही हे दोन संघ जाणार फायनलमध्ये! हे चार संघ गाठणार सेमीफायनल; दिग्गजाची मोठी भविष्यवाणी..

Prithvi Shaw Double Century: 244 धावांची वादळी खेळी साकारत पृथ्वीचा वर्ल्ड कप संघावर दावा; पाहा व्हिडिओ..

Shiv Thakare Daisy Shah: त्या एका कारणामुळे डेझी शाह आहे शिव ठाकरेच्या प्रेमात पागल; व्हिडिओमुळे झाला खुलासा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.