PM Kisan 14th installment: अजूनही 14 व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत? केवळ करा हे काम, झटक्यात येतील पैसे..

0

PM Kisan 14th installment: देशातील शेतकऱ्यांना (indian farmer) आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने (central government) पीएम किसान योजनेची (PM Kisan Yojana) सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. सहा हजार रुपयांची ही रक्कम तीन टप्प्यात दोन हजार या रकमेप्रमाणे देण्यात येते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजस्थानमधील एका कार्यक्रमात 14 वा हफ्त्याचे वितरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलैला 14 व्या हप्त्याचे वितरण केले असले, तरी अद्यापही काही शेतकऱ्यांचा बँक खात्यात दोन हजार रुपयाचा १४ वा हप्ता जमा झालेला नाही. जर तुमच्या देखील बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जमा झाला नसेल, तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. याविषयी जाणून घेऊया सविस्तर..

चौदाव्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये का जमा झाली नाही, हे तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेचं लाभार्थी अकाउंट चेक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला “Know Your Status” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला समोरील रकान्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर, समोरील रकन्यामधील कॅप्चा कोड टाकून ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

समोरील रकान्यामध्ये कॅप्चा कोड व्यवस्थित टाकल्यानंतर, तुम्हाला “गेट डेटा” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर “get data” या पर्यायावरच क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असणाऱ्या स्क्रीनवर चौदाव्या हप्ता विषयी सर्व माहिती तुम्हाला मिळेल. जर तुम्ही इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर तुमचा 14 वा हप्ता रखडला असल्याचं सांगितलं असेल. परंतु तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, लगेचच तुमच्या बँक खात्यात14 वा हप्ता जमा केला जाईल.

हे देखील वाचा Face fat burning: तुमचाही चेहरा सुजलेला दिसतो? फॉलो करा या चार टिप्स चेहऱ्याची चरबी होईल गायब..

Smartphone Under 15k: 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार स्मार्टफोनची पाहा ही यादी..

Ishan Kishan ईशान किशनसाठी ती तब्बल चार तास थांबली, अन् अखेर तिने आय लव यू म्हणत प्रपोजही केलं, पाहा तो व्हिडिओ..

Chanakya quotes: पत्नीचा हे दोन अवगुण माणसाला उठवतात समाजातून..

Smart Watch: Noise, boAt, Fastrack स्मार्ट वॉच केवळ एक हजारांत खरेदी करण्याची संधी; पाहा संपूर्ण यादी..

Electric Scooter: कमी किंमतीत दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 200 किमी रेंज, किंमत केवळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.