Fliese disposal tips: घरात माशांनी धुडगूस घातलाय? फक्त करा हा उपाय, माशी पुन्हा शोधूनही सापडणार नाही..

0

Fliese disposal tips: पावसाळा (Monsoon) सगळ्यांचा आवडता ऋतू असला तरी पावसाळ्याबरोबर पावसाळा अनेक समस्या घेऊन येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये तुमच्या आरोग्याला (heath) अधिक धोका असतो. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर तुम्ही आजारी पडण्याची अधिक शक्यता असते.

पावसाळ्यामध्ये आरोग्याचा धोका अधिक का निर्माण होतो? याविषयी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, पावसाळ्यामध्ये माशा आणि किटकाची उत्पत्ती होते. साहजिकच कीटक आणि माशांचा वावर आपल्या घरामध्ये वाढतो. घरातील अनेक वस्तूंवर अन्नपदार्थांवर माशा बसल्यामुळे साहजिकच आपल्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

जर तुमच्या देखील घरामध्ये माशांनी धुडगूस घातला असेल, तर तुम्हाला फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आज आपण या लेखामधून घरामधून माशांची कशी विल्हेवाट लावायची? याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. पावसाळ्यामध्ये अनेकदा घरामध्ये माशाचा वावर वाढतो आपण अनेक उपाययोजना करतो मात्र तरी देखील माझ्या पाहायलाच मिळतात. जर तुमच्या बाबतीत देखील असा प्रकार घडत असेल तर चिंता करू नका.

बाथरूम मधून माशा थेट किचनमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे अन्नपदार्थांवर जंतू निर्माण होतात. आणि म्हणून, माशांचा माशांची विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही फरशी पुसताना पाण्यामध्ये काही पदार्थ मिसळायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला फरशी पुसताना पाण्यामध्ये व्हिनेगर मिसळायचा आहे. फरशी पुसताना तुम्ही निर्णयाचे पाणी देखील वापरू शकता ज्यामध्ये तुम्ही व्हिनेगर मिसळा. व्हिनेगर माशांसाठी रामबाण उपाय आहे. व्हिनेगरच्या वासामुळे माशा जवळही फिरकत नाहीत.

व्हिनेगर (Vinegar) बरोबर फरशी पुसताना त्यामध्ये तुम्ही फिनाइलचे काही थेंब देखील मिसळू शकता. माशांना घरातून संपुष्टात आणण्यासाठी फिनाईल (phenyl) देखील प्रभावी औषध आहे. फिनाईलच्या वासामुळे माशांबरोबर घरातील असणारे छोटे कीटक देखील संपुष्टात येतात.

घरातील मच्छर माशा किटके या सगळ्यांवर घरगुती आणि रामबाण उपाय म्हणून मीठ आणि बेकिंग सोड्याचा (Salt and baking soda) वापर प्रभावी ठरतो. फरशी पुसताना पाण्यामध्ये तुम्ही मीठ आणि बेकिंग सोडा टाका. आणि या पाण्याने फरशी व्यवस्थित पुसून घ्या. हा उपाय केल्यानंतर देखील माशा घरातमध्ये येत नाहीत.

हे देखील वाचा IND vs WI 1st Odi: अशी आहे पहिल्या वनडेसाठी भारताची अंतिम अकरा; जाणून घ्या सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण..

Couple Water Park video: पाण्यातच गडी आला खळीला, अन् वॉटर पार्कलाच केलं Oyo; पाहा तो व्हिडिओ..

Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.