वीज पडून तरुणाचा मृत्यू;मृतदेहही गेला वाहून..

0

सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागात परतीच्या पाऊस हा जोरदार बरसतोय. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच लाखोंचे नुकसान तर होतच आहे,परंतु जीवित हानी देखील झाल्याचे पाहायला मिळतेय.

सांगोला तालुक्यातील हंगिरगे गावात २३ वर्षीय तरुणाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव शुभम साबळे असं आहे.

शुभम हा घरातील गॅस संपल्यामुळे दुपारी चार वाजता गॅस आणण्यासाठी गावात गेला होता. यादरम्यान जोरदार पाऊस येऊ लागल्याने त्याने एका झाडाचा आडोसा घेतला. आणि तिथेच वीज पडून या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाच्या पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे त्याचा मृतदेह देखील वाहून गेला होता.

गावकऱ्यांनी शोध घेतला असता शुभमचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर सापडला. दुर्दैवी मृत्यू झालेला शुभमचे सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.