Kl Rahul: लग्नानंतर सुनील शेट्टीने के एल राहुलला अशी दिली होती समज; अथियालाही म्हणाले होते डोळे झाकून विश्वास ठेव..
Kl Rahul: सुनील शेट्टी (sunil Shetty) हे बॉलीवूड (Bollywood) मधील दिग्गज नाव आहे. सुनील शेट्टीने नाईंटीनमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. परतू सिने सृष्टी पासून स्वतःला लांब ठेवत, सुनील शेट्टीने हॉटेल व्यवसायात आपला जम बसवला. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि केल राहुल (KL Rahul athiya Shetty) एकमेकांना डेट करत होते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि अखेर यावर्षी जानेवारीमध्ये दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले.
केएल राहुल हा दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा सदस्य नाही. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध खेळताना त्याला दुखापत झाली होती. त्याच्या पायाचे ऑपरेशन देखील करण्यात आले. एका चांगल्या खेळाडू बरोबर केल राहुल चांगला व्यक्ती देखील असल्याचं बोललं जातं. मात्र तरी देखील त्याल सुनीलने एक सल्ला दिला होता. ज्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.
सुनील शेट्टी आपल्या फिटनेस आणि लाईफस्टाईल विषयी प्रचंड जागृत आहेत. सुनील शेट्टीने बॉलीवूडमध्ये जंटलमेन म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. सुनील शेट्टी अनेक सोशल विषयावर देखील उघडपणे बोलताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी बायकॉट बॉलिवूड या संदर्भात देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून देखील सुनील शेट्टीने भाष्य केले होते.
अनेक गोष्टीबाबत जाणीव अअसणाऱ्या सुनील शेट्टीने लग्नानंतर के एल राहुल आणि अथिया शेट्टीला देखील समज आणि सल्ला दिला होता. सुनील शेट्टीने नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राहुल आणि अथियाला लग्नानंतर मी काही गोष्टी सांगितल्या. मी माझ्या मुलीला सांगितलं, तू खूप भाग्यवान आहेस, तुला केल राहुल सारखा मुलगा मिळाला आहे.
प्रत्येक सुखदुःखात तू तुझ्या नवऱ्याला साथ देणे आवश्यक आहे. तू असा जोडीदार बनले पाहिजे, जो तुझ्या पार्टनरवर डोळे झाकून विश्वास ठेवेल. याबरोबरच तो एक खेळाडू आहे, त्याला अनेक ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागणार हे तू लक्षात ठेव. प्रत्येक वेळेला तुला तो सोबत घेऊन जाईलच, असं नाही. अनेकदा या गोष्टी शक्य होत नाहीत, अशावेळी तू समजून घेणे गरजेचे आहे. शिवाय तो एक खेळाडू आहे, ॲक्टर प्रमाणे त्याच्या देखील आयुष्यात चढ उतार येणार, अशावेळी तू साथ देणे आवश्यक आहे.
केल राहुलला समजावण्याची आवश्यकता नाही, मी खरोखरच खूप भाग्यवान आहे त्याच्यासारखा जावई मला मिळाला. पण मी त्याला एक सल्ला नक्की देईन, तू इतकाही चांगला व्यक्ती बनू नकोस, की लोकांना तुझ्या चांगलेपणाची किंमत राहणार नाही. तू इतकाही चांगला म्हणून राहू नकोस, ज्यामुळे तुला कमी लेखलं जाईल. अशी समज केएल राहुल सुनील शेट्टी यांनी लग्नानंतर दिली होती. असा खुलासा त्यांनी स्वतः एका माध्यमाला बोलताना केला आहे.
हे देखील वाचा Yashasvi Jaiswal: यशस्वीच्या दमदार पदार्पणामुळे भारताच्या या दिग्गज खेळाडूचे करिअर संपुष्टात..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम