Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023: या उमेदवारांसाठी 1,782 जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर..

0

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023: बेरोजगारी (unemployment) मोठ्या प्रमाणात असली तरी काही विभागात नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. नुकतीच महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयामध्ये मोठ्या पदाची भरती निघाली असून, यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 20 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. (Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023)

महाराष्ट्र नगरपरिषद संचालना अंतर्गत एकूण 1782 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जाणून घेऊया, रिक्त पदांचा तपशील आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता.

स्थापत्य अभियंता गट-क या पदासाठी एकूण दोनशे 91 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारानेसिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असणे आवश्यक. सोबतच MS-CIT देखील आवश्यक आहे.

विद्युत अभियंता या पदासाठी एकूण 48 रिकजगा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. सोबतच MS-CIT देखील आवश्यक आहे.

संगणक अभियंता या पदासाठी एकूण 45 रिक्त जगभरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक. सोबतच MS-CIT देखील महत्वाचा आहे. पाणीपुरवठा जलनिस्सारण आणि स्वच्छता अभियंता या पदासाठी एकूण 65 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार मेकॅनिकल त्याचबरोबर पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा देखील पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच MS-CIT अनिवार्य.

लेखापरीक्षक आणि लेखापाल या पदासाठी एकूण 247 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यसाठी उमेदवाराने B.Com केलेले असणे आवश्यक आहे. सोबतच MS-CIT देखील अनिवार्य आहे.

कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी” या पदासाठी एकूण 579 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेमधील पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे

“अग्निशमन अधिकारी” या पदासाठी एकूण 372 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे.

स्वच्छता निरीक्षक” या पदासाठी एकूण -35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. उसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण असणारी असावी. याशिवाय स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा देखील पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी

महाराष्ट्र नगरपरिषद संचालनाअंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांचे वय हे 21 ते 38 वयापर्यंत असणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. ओपन कॅटागिरी उमेदवारांसाठी 1000 रुपये परीक्षा फी असणार आहे.

ऑनलाईन अर्ज

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी 20 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.mahadma.maharashtra.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा https://drive.google.com/file/d/1s5kQn8fwWPV_LwWHW91G-GcSyKDd7jWr/view?usp=drivesdk

हे देखील वाचा Yashasvi Jaiswal: यशस्वीच्या दमदार पदार्पणामुळे भारताच्या या दिग्गज खेळाडूचे करिअर संपुष्टात..

e-commerce website: या सरकारी वेबसाइटने Flipkart, amazon चा उठवला बाजार; प्रचंड स्वस्तात मिळतात वस्तू..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.