Yashasvi Jaiswal: यशस्वीच्या दमदार पदार्पणामुळे भारताच्या या दिग्गज खेळाडूचे करिअर संपुष्टात..

0

Yashasvi Jaiswal: 12 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पहिल्या कसोटी (1st test) सामन्याला सुरुवात झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर, भारतीय संघात काही बदल करण्यात आले. काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आल्यानंतर, या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. नवीन खेळाडू कशी कामगिरी करतात? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिल्यानंतर, आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (IND vs WI 1st test 3rd day)

भारताच्या तुलनेत वेस्टइंडीजचा कसोटी संघ तुल्यबळ नसला तरी भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष निश्चितच लागून राहिले होते. के एल राहुलचा अनुपस्थितीत शुभमन गिलला कसोटीमध्ये सलामी करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने सलामीला येऊन कसोटीमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र कसोटी संघात यशस्वी जयस्वालचा सलामीवीर म्हणून भारतीय संघात सामावेश करण्यात आल्याने, शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळावं लागत आहे.

यशस्वी जयस्वालने पदार्पणातच नाबाद दमदार शतकी खेळी केली. साहजिक आता तो भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर म्हणून सध्या तरी उदयास आला आहे. यशस्वी सलामीला येणार असल्याने,आता तिसऱ्या क्रमांकावर टीम मॅनेजमेंट शुभमन गिलला खेळवू पाहत आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी पार पाडणाऱ्या चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) भारतीय कसोटी संघात स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी पुजाराने पार पडली. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना चेतेश्वर पुजाराने अनेक महत्त्वपूर्ण खेळ्या केल्या. मात्र आता चेतेश्वर पुजाराचे भारतीय कसोटी संघामधील स्थान धोक्यात आले आहे. यशस्वीने सलामीला येऊन, दमदार पदार्पण केले. शिवाय दुसरीकडे शुभमन गिलने देखील क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दमदार खेळ केला आहे. अशा परिस्थितीत गिलकडे तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी आहे.

चेतेश्वर पुजाराला भारतीय कसोटी संघात स्थान मिळवायचं असेल, तर डोमेस्टिक आणि काउंटी क्रिकेटमध्ये दमदार खेळ करावा लागेल. तसं पाहायला गेलं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पूर्वी चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना तीन शतके देखील ठोकली होती. तरीदेखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अपयशी ठरल्याने, त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

यशस्वी आणि गिल दोघेही आपापल्या क्रमांकावर उत्तम फलंदाजी करत राहिले, तर चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात पुनरागमन करणे जवळजवळ अशक्य आहे. यशस्वी आणि गिल जबरदस्त फॉर्ममध्ये असून, सध्या हे दोघे अपयशी ठरतील, असं दिसत नाही. या दोघांपैकी जर एका खेळाडूने फारच सुमार कामगिरी केली, आणि दुसरीकडे चेतेश्वर आपल्या बॅटमधून आग ओकत राहिला, तरच पुजाराला भारतीय संघात स्थान मिळू शकते अन्यथा नाही.

हे देखील वाचा e-commerce website: या सरकारी वेबसाइटने Flipkart, amazon चा उठवला बाजार; प्रचंड स्वस्तात मिळतात वस्तू..

Weather Update: उत्तर भारतात पाऊसाचे थैमान, तर महाराष्ट्रात फिरवली पाठ; अशी आहे महाराष्ट्रात पाऊसाची स्थिती..

Relationship: ..म्हणून या तीन पोरांकडे पोरी ढुंकूनही पाहत नाहीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.