e-commerce website: या’ सरकारी वेबसाइटने Flipkart, amazon चा उठवला बाजार; प्रचंड स्वस्तात मिळतात वस्तू..

0

e-commerce website: धावपळ, कामाच्या व्यापामुळे अलीकडच्या काळात प्रत्यक्ष बाजारात जाऊन शॉपिंग करणे शक्य होत नाही. त्यातच फ्लिपकार्ट (Flipkart) आणि ॲमेझॉन (Amazon) यासारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर (e commerce website) ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देखील दिला जातो. साहजिकच यामुळे आता असंख्य जण ई-कॉमर्स वेबसाईटवरूनच आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंची खरेदी करतात.

जर तुम्ही देखील फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवरून शॉपिंग करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटचा बाजार उठवण्यासाठी एका सरकारी वेबसाईटने पाऊल ठेवलं आहे. ONDC असं या वेबसाईटचे नाव आहे. सरकारची ही नवीन वेबसाईट फारशी चर्चेत नाही. मात्र गेल्या काही महिन्यात या वेबसाईटवरून अनेक वस्तूंची विक्रमी विक्री झाली आहे.

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन विदेशी ई-कॉमर्स वेबसाइट्स आहेत. अनेकजण या वेबसाईटवरून शॉपिंग करत असले तरी आता या दोन्ही वेबसाईटला देखील सरकारच्या ONDC या ई-कॉमर्स वेबसाइटने पाठीमागे टाकले आहे. सरकारच्या या वेबसाईटने एका दिवसामध्ये तब्बल पस्तीस हजाराहून अधिक बॉर्डर दिल्या आहेत. सरकारी वेबसाईटचे कमिशन कमी असल्याने, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या दोन्ही वेबसाईट पेक्षाही कमी किमतीमध्ये वस्तू विकल्या जात आहेत.

आकडेवारी केली जाहीर..

ONDC ने नुकतीच आकडेवारी जारी केली. यामध्ये दिल्ली-NCR मधून 11 हजार रिटेल ऑर्डर झाल्या आहेत. ही केवळ रविवारची आकडेवारी आहे. त्याचबरोबर बंगळुरूमधून 7 हजार ऑर्डर झाल्या आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, पुणे,हैदराबाद या शहराने देखील मोठ्या प्रमाणात या वेबसाईटवरून खरेदी केली आहे. सरकारच्या या वेबसाईटवर केवळ दोन ते तीन टक्के कमिशन असल्याने अनेक प्रोडक्टची किंमत खूप कमी आहे.

या वस्तू मिळतायत अधिक स्वस्त

ONDC या सरकारी वेबसाईटवरून जास्त प्रमाणात ऑर्डर झालेल्या वस्तूंमध्ये फूड, किराणा, याशिवाय शेतीशी संबंधित अनेक वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे सरकारने निर्मित केलेल्या या वेबसाईटवर खरेदी आणि विक्री करणारा ग्राहक देखील लाभ घेऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मालाची विक्री करायची असेल, तर तुम्ही या वेबसाईटचा आधार घेऊ शकता.

लवकरच मिळणार या सुविधा 

सध्या या वेबसाईटवर फुड आणि किराणा त्याचबरोबर शेतीविषयक वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असली तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच बँकिंग सुविधा देणार असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करण्याची संधी देखील या वेबसाईटच्या माध्यमातून मिळणार आहे. सरकारने ONDC या ई कॉमर्स वेबसाईट बरोबर ॲप देखील लॉंच केले आहे.

हे देखील वाचा Weather Update: उत्तर भारतात पाऊसाचे थैमान, तर महाराष्ट्रात फिरवली पाठ; अशी आहे महाराष्ट्रात पाऊसाची स्थिती..

India vs Pakistan world cup 2023: पाकिस्तान संघाशिवाय होणार वनडे विश्वचषक; पाकिस्तान सरकारने घेतला निर्णय..

Relationship: ..म्हणून या तीन पोरांकडे पोरी ढुंकूनही पाहत नाहीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.