५ लाखाचे मांजर मागवले ऑनलाइन, आणि आले ….

0

सोशल मीडियावर काय वायरल होईल ते सांगता येत नाही. ऑनलाइन शॉपिंगमध्ये तर अनेक वेळा फसवणूक झाल्याच्या घटना वेळोवेळी समोर आलेल्या आहेत. मोबाईल मागवला आणि साबण आला. अशा अनेक घटना घडल्याचे आपल्याला माहित आहे. अशीच एक विचलित करणारी घटना आपण पाहणार आहोत.

घरी पाळण्यासाठी एका मांजर प्रेमिला मांजर हवे होते. त्यासाठी त्याने ऑनलाईन पैसे सुध्दा जमा केले. घरी ऑर्डर आली,बॉक्स ओपन केला. त्यामधे पाच लाखांचे मांजर होते.

मात्र काही दिवसांनी त्या पिल्लामधील झालेल्या शारीरिक बदलांमुळे ते एक मांजर नसून वाघिणीचे पिल्लू आहे हे स्पष्ट झाले. सुरुवातीला मात्र या दोघांना हे मांजर आहे की बछडा आहे हे समजलेच नव्हते.

ही घटना २०१८ मधील आहे. हा सर्व प्रकार फ्रान्स या देशामध्ये घडला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

जेव्हा या जोडप्याच्या हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. या घटनेचा तपास सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हा सर्व प्रकार उघड झाला होता. तपासानंतर पुढे आले की, हा इंडोनेशिया मधील सुमात्रा वाघ आहे. मात्र त्या बॉक्स मध्ये वाघ कसा आला याचा मात्र तपास लागला नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.