PM Kisan Yojana: योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज; या दिवशी जमा होणार चौदावा हप्ता..

0

PM Kisan Yojana शेतकऱ्यांना (farmer) आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने (centre government) पीएम किसान (PM Kisan Yojana) योजना राबवायला सुरुवात केली. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 13 हप्ते जमा झाले आहेत. मात्र पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अजूनही काही शेतकरी लाभ घेत नसल्याचे समोर आले आहे. जर तुम्ही देखील अजूनही, या योजनेचा लाभ घेत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (PM Kisan Yojana)

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना करते. सहा हजार रुपयांची रक्कम जर चार महिन्यांनी दोन हजाराचे तीन हप्ते, या प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 13 हप्ते केंद्र सरकारकडून हस्तांतरित करण्यात आले आहेत. म्हणजेच, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत 26 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

कधी पर्यंत येणार १४ वा हप्ता?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी चौदाव्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा केली नसली तरी मीडिया रिपोर्टनुसार शेतकऱ्यांना 14 वा हप्ता शुक्रवारी 23 जून रोजी मिळणार असल्याची माहिती आहे.

खात्याची स्थिती तपासा

पीएम किसान योजनेचा 14 हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल, तर तुम्हाला 14 वा हप्ता मिळणार नाही. तुमच्या खात्यात 14 वा हप्ता जमा होणार की नाही? हे पाहण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

तुमच्या अकाउंटवर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता जमा होणार आहे की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. यानंतर पीएम किसान योजनेचे अधिकृत पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल.

पोर्टल ओपन झाल्यानंतर, तुम्हाला लगेच “लाभार्थी स्थिती” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर “लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोरील रकान्यामध्ये तुम्हाला दहा अंकी मोबाईल क्रमांक सबमिट करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल.

समोरील रकान्यामध्ये हा कोड टाकून तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या अकाउंटची स्थिती तुम्हाला पहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला E-KYC संदर्भात तीन पर्याय पाहायला मिळतील. या पर्यायापुढे जर “हो” असे लिहिलं असेल, तर तुम्हाला 14 वा हप्ता मिळू शकतो. “नाही” असं लिहिलं असेल, तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी असा करा अर्ज

पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्ही या योजनासाठी पात्र असाल, तर तुम्हाला अर्ज केल्यानंतर, या योजनेचा लाभ मिळू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://pmkisan.gov.in/ असं सर्च करा. नंतर पीएम किसान योजनेची वेबसाईट ओपन होईल. वेबसाइट ओपन झाल्यानंतर, तुम्हाला “न्यू फार्मर रजिस्ट्रेशन” या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुम्ही तुमची भाषा निवडायची आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातील शेतकरी असाल, तर तुम्हाला “ruler farmer registration” हा पर्याय निवडायचा आहे. जर तुम्ही शहरी भागात असाल, तर तुम्हाला “urban farmer registration” हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकून, राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर समोरील पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या जमिनी संदर्भात कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यामध्ये सातबारा उतारा, ८अ इत्यादी. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून “GET OTP ” या पर्यायावर क्लिक करा, आणि आलेला ओटीपी सबमिट करा. या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

हे देखील वाचा PM Kisan Samman Nidhi: १४ व्या हप्त्याची तारीख निश्चित! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ४ हजाराचा हप्ता; तुम्हाला मिळणार का? जाणून घ्या या पध्दतीने..

What Came First Chicken or Egg: कोंबडी आधी की अंड? अखेर या प्रश्नाचे उत्तर समजले! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

Shark Eats Man video: शार्क माशाने माणसाला गिळले जिवंत; पाहा दोघांचा थरारक व्हिडिओ..

Redmi 12: 50MP चा दमदार कॅमेरा आणि बरच काही, किंमत फक्त बारा हजार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि फीचर्स..

shubman gill: सारा नव्हे या पोरीच्या प्रेमात पागल आहे शुभमन गिल? त्या फोटोमुळे झाला भांडाफोड..

Asia Cup 2023: पाकिस्तानमध्ये होणार सामने; भारत पाकिस्तान तीन वेळा होणार लढत, वाचा सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.