Redmi 12: 50MP चा दमदार कॅमेरा आणि बरच काही, किंमत फक्त बारा हजार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि फीचर्स..

0

Redmi 12 लाँच: गेल्या काही वर्षात मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या Redmi ने आपला आणखी एक दमदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याचे नाव Redmi 12 असं आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, Redmi 12 मार्केट गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा Redmi स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट स्क्रीनसह ग्राहकांना मिळणार आहे. सोबतच पंच-होल कटआउट त्याचबरोबर 6.79-इंच फुलएचडी+ डिस्प्ले देखील मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, या फोनला तब्बल 50MP ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक..

redmi 12 किंमत

Redmi 12 हा स्मार्टफोन 8 GB रॅम तसेच 128 GB स्टोरेजसह असणार आहे. ज्याची किंमत 12 हजार रुपये असणार आहे. मिडनाईट ब्लॅक तसेच स्काय ब्लू आणि पोलर सिल्व्हर या रंगांमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे. 4 GB रॅमच्या स्मार्टफोनची किंमत दहा हजाराच्या आसपास असणार आहे. कंपनीने अद्याप अधिकृतरित्या किंमत जाहीर केली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार ही किंमत सांगण्यात आली आहे.

Redmi 12 तपशील

डिस्प्ले: Redmi 12 स्मार्टफोचा डिस्प्ले हा 6.79-इंच असणार आहे. जो फुलएचडी+ रिझोल्यूशनसह येतो. उन्हामध्ये फोन वापरण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी स्क्रीन 550 nits ब्राइटनेससह देण्यात आली आहे. त्याचबरोबर MediaTek Octa-core 12nm Helio G88 प्रोसेसर देखील असणार आहे.

स्टोरेज

Redmi 12 स्मार्टफोन ग्राहकांना 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह मिळणार आहे. त्याचबरोबर 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज तसेच 8 gb आणि 256 जीबी स्टोरेज हे पर्याय देखील ग्राहकांसमोर असणार आहेत. हा स्मार्टफोन Android 13 आधारित MIUI 14 चालतो.

बॅटरी

रेडमीच्या या स्मार्टफोन बॅटरी विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, बॅटरी देखील दमदार देण्यात आली आहे. या smartphone ची बॅटरी 5000mAh असणार आहे. जी 18w चार्जरला सपोर्ट करते. तसेच FM रेडिओची देखील सुविधा असणार आहे. 3.5mm ऑडिओ जॅक तसेच Type-C USB देण्यात आली आहे.

कॅमेरा

सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे, या स्मार्टफोनचा कॅमेरा फारच दमदार देण्यात आला आहे. Redmi 12 या स्मार्टफोनला F/1.8 सह 50MP प्राइमरी कॅमेरा दिला आहे. जो सर्वोत्तम मानला जात आहे. तसेच 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP सेन्सर असा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप या स्मार्टफोनला देण्यात आला आहे. सेल्फी तसेच व्हिडीओ कॉल करण्यासाठी फ्रंट कॅमेरा 8MP देण्यात आला आहे. सोबतच सुरक्षेसाठी या फोनला फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक असे देखील फीचर देण्यात आले आहे.

हे देखील वाचा Indurikar Maharaj: इंदुरिकर महाराज यांना अटक करण्याचे कोर्टाचे आदेश; ते घाणेरडं वक्तव्य भोवले..

shubman gill: सारा नव्हे या पोरीच्या प्रेमात पागल आहे शुभमन गिल? त्या फोटोमुळे झाला भांडाफोड..

Vastu Tips: अशा ठिकाणी घर बांधल्यास व्हाल बर्बाद, जाणून घ्या घर बांधण्याचे योग्य ठिकाण..

Chanakya Niti: ही तीन कामे केल्यामुळे अफाट कष्ट करूनही लक्ष्मी राहते सदैव नाराज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.