Asia Cup 2023: पाकिस्तानमध्ये होणार सामने; भारत पाकिस्तान तीन वेळा होणार लढत, वाचा सर्व डिटेल्स..
Asia Cup 2023: क्रिकेटमध्ये सर्वात मोठे प्रतिस्पर्धी म्हणून भारत पाकिस्तान या दोन संघाकडे पाहिले जाते. फक्त भारत पाकिस्तानचे क्रिकेट चाहतेच हा सामना पाहण्यासाठी उत्सुक नसतात, तर जगभरातल्या असंख्य क्रिकेट चाहत्यांचे भारत पाकिस्तान या सामन्याकडे लक्ष असतं. भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan Asia Cup 2023) सामन्याचा थरार पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना आशिया कपमध्ये पाहायला मिळणार आहे. (ASIA CUP 2023 Dates and Venues Announced)
आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी आशिया कप स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानकडे होते. मात्र भारत पाकिस्तानमध्ये जाऊन खेळणार नसल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. सहाजिकच यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डाकडून शाब्दिक वार देखील पाहायला मिळालं. अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) बीसीसीआय (BCCI) समोर झुकावे लागले आहे.
भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचे BCCI ने स्पष्ट केल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलचा (Hybrid model) पर्याय ठेवला. यावर देखील वाद झाल्यानंतर, अखेर या मॉडेलला सहमती दर्शवली आहे. यानुसार आता पाकिस्तानमध्ये आशिया कपचे (asia cup 2023) 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर उर्वरित 9 सामने श्रीलंका या देशात खेळण्यात येणार आहेत.
आशियाई क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, यावर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे. 31ऑगस्टला या स्पर्धेला सुरुवात होणारा असून, या स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेत खेळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेमध्ये क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान एकूण तीन वेळा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळू शकते.
अशी रंगणार स्पर्धा
यावर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेमध्ये एकूण 13 सामने होणार आहेत. हे तेरा सामने सहा संघांमध्ये खेळण्यात येतील. या स्पर्धेचे विभाजन एकूण दोन गटात करण्यात आले आहे. म्हणजेच एका गटात तीन आणि दुसऱ्या गटात तीन संघाचे विभाजन होणार आहे. एका गटात नेपाळ, पाकिस्तान आणि भारताचा समावेश आहे. दोन्ही गटातले दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करणार आहेत.
तीन भारत पाकिस्तान येणार आमने-सामने
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत भारत पाकिस्तान तीन वेळा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळू शकते. सहा संघाचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. म्हणजेच एका गटात तीन संघ असणार आहेत, या तीन संघापैकी ज्या दोन संघांना अधिक गुण असतील, त्यांची एन्ट्री सुपर फोरमध्ये होईल.
यासाठी भारत आणि पाकिस्तान संघाला साखळी सामन्यात अधिक गुण घेऊन सुपर फोरमध्ये पोहचावे लागेल. सुपर फोर संघामध्ये एकूण सहा सामने खेळण्यात येणार आहेत. म्हणजेच एक संघ प्रत्येक संघाबरोबर एकदा खेळणार आहे. ज्या दोन संघांना अधिक गुण असतील, अशा दोन संघामध्ये आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. सुपर फोरमध्ये जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना सर्वाधिक गुण मिळाले, तर या स्पर्धेचा अंतिम सामना भारत पाकिस्तान असा होऊ शकतो. याचाच अर्थ, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकूण तीन वेळा आमने सामने येऊ शकतो.
Dates and venues have been finalised for the Asia Cup 2023! The tournament will be held from 31st August to 17th September in a hybrid model – with 4 matches being held in Pakistan and the rest in Sri Lanka! https://t.co/bvkfSSAp9w#AsiaCup #ACC
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) June 15, 2023
टीम इंडियाचा दबदबा
आशिया चषक स्पर्धा भारताने सर्वाधिक वेळा जिंकलेली आहे. भारतानंतर अशिया चषक अधिक वेळा जिंकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. आतापर्यंत एकूण पंधरा वेळा ही स्पर्धा पार पडली आहे. ज्यामध्ये सात वेळा भारताने, तर सहा वेळा श्रीलंकेने किताब फटकवण्याचा विक्रम केला आहे. तर पाकिस्तान संघाला केवळ दोन वेळा ही स्पर्धा जिंकता आली आहे.
हे देखील वाचा Wedding Viral video: या किरकोळ कारणासाठी नवरीने वाजवली नवरदेवाच्या कानाखाली; पुढे जे घडलं ते कल्पणे पलिकडचे..
Ileana dCruz: अखेर इलियानाच्या बाळाचा पिता समजला; bollywod च्या स्टार अभिनेत्याचे नाव आले समोर..
Chanakya Niti: ही तीन कामे केल्यामुळे अफाट कष्ट करूनही लक्ष्मी राहते सदैव नाराज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम