Hema Meena: पगार तीस हजार, घरातला टिव्ही 30 लाखांचा, फिरायला महिंद्राची थार; महिला अधिकाऱ्याचा नादच नाय..

Hema Meena: सरकारी अधिकारी आणि भ्रष्टाचार हे काही नवीन नाही. आत्तापर्यंत कित्येक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेले आपण पाहिले आहेत. त्यात मग ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकपासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत बरेच जण सापडलेले पाहायला मिळतात. यामध्ये 500 रुपयांपासून काही लाख रुपयांपर्यंत लाचेची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु सध्या एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत, कारण अवघ्या 30 हजार रुपये पगारावर नोकरी करणाऱ्या कंत्राटी अधिकारी बाईंची (Hema Meena) संपत्तीचं एवढी आहे, की एका बड्या उद्योगपतीला देखील लाजवेल.

 

 

तर ही घटना मध्य प्रदेशातील बिलखिरीया येथील आहे. त्याच झालं असे की लोकायुक्तांनी प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळातील सहायक प्रभारी अभियंता यांच्या घरी धाड टाकली. हेमा मीना (Hema Meena) यांची संपत्ती जाणून घेण्याअगोदर एक गोष्ट जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे, ती म्हणजे मॅडमचा पगार 30 हजार आहे आणि घरातील टिव्ही 30 लाख रुपये किमतीची आहे. हा जप्त केलेला टिव्ही त्यांनी नवीनच घेतला होता. तो अजून बॉक्समध्येच होता. आपण ही किंमत ऐकून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अंदाज तुम्ही लावू शकता.

 

हेमा मीना (Hema Meena) या सध्या ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्याच बंगल्यावर धाड टाकण्यात आली होती. तो बंगला अक्षरश: वेगवेगळ्या आलिशान वस्तूंनी भरलेला होता. आता विशेष म्हणजे हेमा मीना (Hema Meena) ह्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अभियंता आहेत. त्या २०११ पासून त्या ठिकाणी नोकरी करत होत्या. त्यांचा मासिक पगार ३० हजार रुपये आहे. यासोबत त्यांच्याकडे 2 ट्रक, 1 टँकर, 1 महिंद्रा थार अशी एकूण तब्बल 10 महागडी वाहने ती ज्या ठिकाणी वास्तव्य करते त्या ठिकाणी सापडली आहेत. एकट्या महिंद्रा थारची एक्स शोरुमची किंमत 10 लाख 50 हजारांपासून सुरू होते. यावरून इतर 9 वाहनांच्या किमतीचा अंदाज आपल्याला येईलच.

 

 

आता हेमा मीना (Hema Meena) या ज्या घरात राहतात, ते त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. या बंगल्यात तब्बल चाळीस खोल्या आहेत. तसेच हा बंगला वीस हजार चौरस फूट एवढ्या जागेवर बांधला आहे. ह्या बंगल्याची किंमत एक कोटीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. दोन खोल्यांचे घर बांधण्यासाठी सर्वसामान्य लोकांचे किती हाल होतात हे त्यांनाच माहीत असते. याशिवाय त्यांचे एक शेतात घर (farm house) आहे. त्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर परदेशी जातीची 55 ज्या आसपास श्वान आढळून आले. त्यांची किंमत त्यांची किंमत काही लाख रुपयांत आहे. तसेच त्यांच्या गोठ्यात 60 – 70 गायी देखील आढळून आल्या आहेत.

 

त्या रहात असलेल्या बंगल्यात 10 पेक्षा अधिक लोक काम करत आहेत. या कर्मचारी लोकांची संपर्क ठेवण्यासाठी हेमा मीना वॉकी टॉकीचा वापर करत आहेत. त्यांच्या घरात एक चपात्या बनवण्याचे मशीन आढळून आले. त्यांची किंमत अडीच लाख रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे हे मशीन त्यांच्याकडे असणाऱ्या श्र्वानांना रोट्या तयार करण्यासाठी वापरले जात आहे.

हेही वाचा: Bageshwar Dham: सध्या देशभरात गाजत असलेले धिरेंद्र शास्त्री यांचे शिक्षण आणि कमाई जाणून बसेल धक्का..

Chanakya Niti: सुखी संसारासाठी या गोष्टी आपण केल्याचं पाहिजेत, अन्यथा लागेल संसाराची वाट 

तुमचे केस पांढरे झालेत का? चिंता सोडा, अवघ्या दोन रुपयांत करा घरच्या घरी काळे तेही नैसर्गिक

Dream11 Prediction Tips: Dream11 वर जिंकायचं असेल, तर या पद्धतीने बनवाव्या लागतील 3 टिम्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.