Bageshwar Dham: सध्या देशभरात गाजत असलेले धिरेंद्र शास्त्री यांचे शिक्षण आणि कमाई जाणून बसेल धक्का..
Bageshwar Dham: सध्या देशभरात गाजत असलेले आणि बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले धिरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krushn Shashtri) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. शास्त्री आणि वाद हे जणू समीकरणच सध्या पाहायला मिळत आहे. मध्यंतरी तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत माफी देखील मागितली होती. सोशल मीडियावर धिरेंद्र शास्त्री गाजत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तरुणाईच्या मनावर देखील ते राज्य करताना पहायला मिळतात.
<span;>तसे पाहायला गेले तर धिरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्र्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) यांची ओळख सोशल मीडियामुळेच देशभरात झाली. कारण त्यांच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळतात. ते आपल्या कार्यक्रमात आलेल्या व्यक्तीची पार्श्वभूमी सांगत असल्याने लोकांना त्यांच्यावर विश्वास बसत आहे. बऱ्याचदा यावरून त्यांच्यावर ताशेरे देखील ओढले जातात. तसेच हे भूलभुलैया आहे, असा देखील आरोप त्यांच्यावर होत असतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील त्यांना आव्हान केले होते, परंतु शास्त्री यांनी त्यावेळी महाराष्ट्रातून पळ काढला होता. चला आपण त्यांच्या शिक्षण आणि कमाईबद्दल जाणून घेऊया.
<span;>धिरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Dham Sarkar) यांनी स्वतः बऱ्याच टीव्ही चॅनल आणि कार्यक्रमामध्ये एकेकाळी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती, असे सांगितले आहे. एवढंच नव्हे तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोन वेळच्या जेवणाचे देखील वांदे असायचे. त्यांच्याकडे मातीचे घर होते. त्या घरात पावसाळ्यात राहणे खूप अवघड होऊन जायचे कारण घराला गळती लागायची. ते वयाच्या नवव्या वर्षापासून मंदिरात जायचे. शास्त्रींना त्यांचे आजोबा मंदिरात घेऊन जायचे. ते आपल्याला आजोबांना गुरू मनायचे.
<span;>धीरेंद्रकृष्ण शास्त्री (Dhirendra Krushn Shashtri- Bageshwar Dham) यांच्या शिक्षणाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जातात. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बागेश्र्वर धाम सरकार यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीएची (BA) पदवी घेतली आहे. तर काही लोक म्हणतात की त्यांनी केवळ आठवीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. परंतु एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्वतः धीरेंद्रकृष्ण शास्त्री (Dhirendra Krushn Shashtri) यांनी आपण बीए पर्यंतचे शिक्षण घेतले असल्याचे सांगितले होते. आपण कॉलेजला असताना व्यवस्थित अभ्यासाकडे लक्ष दिले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.
<span;>कमाई: एका मीडिया रिपोर्टनुसार धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांची (Dhirendra Krushn Shashtri- Bageshwar Dham) प्रत्येक महिन्याची कमाई 3.5 लाख रुपये आहे. परंतु एका टीव्ही चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री यांना त्यांच्या कमाईबद्दल विचारले असता त्यांनी आपले उत्पन्न हे निश्चित नसल्याचे सांगितले होते. परंतु त्यावेळी त्यांनी आपली कमाई किती या प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नव्हते. या प्रश्नाला त्यांनी त्यावेळी बगल दिली होती. परंतु त्यावेळी त्यांनी एक उत्तर दिले होते की, माझी संस्था ही कंपनी किंवा व्यवसाय नाही. माझ्यावर करोडो सनातनी लोकांचे प्रेम आहे.जेवढे सनातनी तेवढे जास्त कमावतात. यावरून अंदाज घ्या, असे बोलून धिरेंद्र शास्त्री यांनी प्रश्न अनुत्तरित ठेवला होता.
<span;> परंतु सोशल मीडियावर त्यांचे अकाउंट आहेत. यूट्यूबवर त्यांचे ४ मिलियांपेक्षा म्हणजे ४० लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स आहेत. यावरून येणारी कमाई निश्चित सांगता येत नसली, तरीदेखील ती काही लाखांमध्ये आहे. तसेच फेसबुकवर देखील त्यांना ४ मिलियनपेक्षा अधिक फोलोअर्स आहेत. त्यातून देखील त्यांनी काही लाखांमध्ये कमाई होत असावी. यावरून अंदाजे त्यांची महिन्याची कमाई अंदाजे १० लाखांपर्यंत असू शकते.
हेही वाचा: Chanakya Niti: सुखी संसारासाठी या गोष्टी आपण केल्याचं पाहिजेत, अन्यथा लागेल संसाराची वाट
तुमचे केस पांढरे झालेत का? चिंता सोडा, अवघ्या दोन रुपयांत करा घरच्या घरी काळे तेही नैसर्गिक
वारस नोंद: आता घरबसल्या करता येणार वारस नोंद; जाणून घ्या अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत..
How to track location: या ट्रिकच्या मदतीने जाणून घ्या जोडीदाराचे लाईव्ह लोकेशन..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.