तुमचे केस पांढरे झालेत का? चिंता सोडा, अवघ्या दोन रुपयांत करा घरच्या घरी काळे तेही नैसर्गिक
How To Convert Grey Hair To Black Naturally
How To Convert Grey Hair To Black Naturally: केस पिकणे हे सध्या सामान्य गोष्ट आहे. तरुणवयातच मुलांची केस पिकलेली आपल्याला पाहायला मिळतात. केस पिकण्याची समस्या सरासरी कुटुंबातील एका व्यक्तीला आहेच. सध्याच्या जीवनशैलीमुळे व तसेच इतर कारणांमुळे केस पिकण्याचे प्रमाण वाढत आहे. तरुण वयातच केस पिकायला लागले की आपल्या मानसिकतेवर परिणाम होताना पाहायला मिळतो. त्यामुळे केस पिकण्याने आपले बाकी काही नुकसान होत नसले तरी मानसिक नुकसान होते. आपण लवकरच वयस्कर दिसू का? अशी भीती वाटू लागते. तसेच यामुळे आत्मविश्वासाचा देखील अभाव निर्माण होऊ शकतो. तसेच बऱ्याच लोकांना केमिकल युक्त हेयर डाय वापरून केस काळे करायचे नसतात. कारण त्यामुळे अधिकच केस पिकू शकतात. त्यामुळे या ब्लॉगमध्ये आपण आपले केस नैसर्गिकरीत्या कसे काळे करता येतील, हे जाणून घेऊया. (How To Convert Grey Hair To Black Naturally)
चहा पावडर: तुम्ही चहा पावडर चा वापर करून केस काळे करू शकता. केस पांढरे होण्याच्या समस्येवर कोरा चहा (Black Tea) वापरून नैसर्गिकरीत्या काळे करू शकता. चहा पावडर केस काळे करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी घेऊन कोरा चहा (Black Tea) बनवावा लागेल. तुम्ही तयार केलेला चहा अगोदर थंड करून घ्या. त्यानंतर तो तुमच्या केसांना सगळीकडे लावून घ्या. चहा केसांना लावल्यानंतर साधारण अर्धा तास थांबा. यानंतर तुम्हाला तुमचे केस धुता येतील. त्यांचे पांढरे झालेले केस काळे करायचे असतील तर आठवड्यातून एकदा हा उपाय करा. तुम्हाला फरक जाणवेल.
मेथी दाणे: मेथीचे दाणे (Fenugreek seeds) घेऊन त्याची पावडर तयार करून घ्या. या पावडरमध्ये 3 ते 4 आवळ्याचा रस (Amla Juice) आणि खोबरेल तेल (Coconut Oil) टाकून त्याला एकत्रित करा आणि पेस्ट तयार करा. तयार झालेला मास्क तुमच्या केसांना लावा आणि साधारणपणे एक तास तसेच ठेवा. त्यानंतर तुम्ही तुमचे केस धुवू शकता. केस काळे करण्याच्या प्रक्रियेत मेथीचे दाणे महत्वाची भूमिका बजावतात. आठवड्यातून एकदा वरील सांगितलेल्या प्रमाणे हे मिश्रण तुमच्या केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांना पोषक घटक तर मिळतीलच तसेच केस काळे होण्यासाठी मदत होईल.
कढीपत्ता (curry leaves): आपल्या रोजच्या जेवणात वापरला जाणारा घटक म्हणजे कढीपत्ता. कुठेही आणि सहज उपलब्ध होणारा कढीपत्ता केस काळे करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला 2 चमचे आवळ्याची पावडर (Amla Powder) घ्यावी लागेल आणि तसेच 2 चमचे ब्राह्मी पावडर (Brahmi Powder) घ्यावी लागेल. या दोन्ही पावडर एकत्रित करून घ्या. त्यानंतर कढीपत्ता बारीक करून या मिश्रणात एकत्रित करून घ्या. तुम्ही कढीपत्ता उखळीमध्ये टेचून घेऊ शकता. या एकत्रित केलेल्या मिश्रणात हलके पाणी मिसळता येईल. कारण पाण्यामुळे केसांना लावणे सोपे जाईल. हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना लावा. (How To Convert Grey Hair To Black Naturally)
नारळाचं तेल (Coconut Oil): खोबरेल तेल हे आपण आपल्या केसांना रोज लावत असतो. परंतु बऱ्याचदा आपण घाई घरबडीत आपल्या केसांना तेल लावत असतो. खोबरेल तेल जर केसांना व्यवस्थित लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. एका भांड्यात खोबरेल तेल (Coconut Oil) घेऊन त्यात लिंबाचा रस आणि कलौंजीच्या बिया भाजून तयार केलेली पावडर हे सर्व एकत्र करून घ्या. हे तयार केलेले मिश्रण केसांना लावण्यापूर्वी ते हलके गरम करून घ्या आणि नंतर ते केसांना व्यवस्थित लावून घ्या. दोन तासानंतर तुमचे केस धुता येतील. यामुळे तुमचे केस काळे होण्यास मदत होईल. (How To Convert Grey Hair To Black Naturally)
हेही वाचा: How to track location: या ट्रिकच्या मदतीने जाणून घ्या जोडीदाराचे लाईव्ह लोकेशन..
वारस नोंद: आता घरबसल्या करता येणार वारस नोंद; जाणून घ्या अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत..
Electric scooter: या आहेत 55 हजारांत मिळणाऱ्या पाच दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या अधिक..
Hair fall tips: म्हणून गळतात पुरुषाचे केस; त्वरित थांबवा या चुका तरच टक्कल पडण्यापासून वाचाल..
Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.