Virat Kohli Sourav Ganguly: पराभवानंतर गांगुली समोर येताच विराटने केले असे काही, पाहून तुमचेही फिरतील डोळे..

0

Virat Kohli Sourav Ganguly: आयपीएल 2023 स्पर्धा (IPL 2023) आता रंगतदार अवस्थेत आली आहे. गुजरात आणि चेन्नई GT and CSK) या दोन संघाचे प्ले ऑफ (playoff) तिकीट जवळपास निश्चित झाले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी स्पर्धेतल्या प्रत्येक संघांना स्थान मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे आता ही आयपीएल स्पर्धा खूपच रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला काल या स्पर्धेतील प्लेऑफमधील आपलं स्थान मजबूत करण्याची मोठी संधी होती. मात्र गोलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीचा फटका बेंगलोर संघाला बसला.

विराट कोहलीच्या संघाचा सामना असल्यानंतर विजय आणि पराभवापेक्षा जास्त चर्चा मैदानावरच्या अग्रेशनची आणि कोहलीच्या कृत्याची होते हे वेगळं सांगायला नको. आज पुन्हा एकदा बेंगलोर संघाच्या पराभवापेक्षा जास्त चर्चा विराट कोहलीच्या कृत्याची झाली. बेंगलोर संघाचा पराभव झाला. मात्र पराभवापेक्षा अधिक चर्चा विराट कोहली आणि सौरभ गांगुलीची झाली. (Virat Kohli Sourav Ganguly video)

विराट कोहली आणि सौरभ गांगुली या दोघांचे नाते क्रिकेट चाहत्यांना चांगलेच माहिती आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर सौरभ गांगुली आणि विराट कोहलीमध्ये दुरावा निर्माण झाला. याचे पडसाद दिल्ली आणि बेंगलोर संघामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात देखील पाहायला मिळाले. मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना विराट कोहलीने सौरभ गांगुलीकडे रागाने पाहत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

दिल्ली आणि बेंगलोर संघामध्ये झालेल्या पहिल्या सामन्याच्या विजयानंतर, कोहली आणि सौरभ गांगुली या दोघांनी हस्तांदोलन देखील केले नव्हते. साहजिकच या घटनेची जोरदार चर्चा झाली. दोघांमध्ये खूपच कलह असल्याचं बोललं गेलं. आणि म्हणून दुसऱ्या सामन्यात देखील सौरव गांगुली आणि विराट कोहली या दोघांकडे क्रिकेटच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. पराभवानंतर कोहली आणि सौरभ गांगुली आमने सामने आले. मात्र यावेळी दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केले.

दोघांनी एकमेकांशी फक्त हस्त आंदोलनच केले नाही, तर सौरभ गांगुली आणि विराट दोघांनीही एकमेकांच्या खांद्यावर हात देखील ठेवला. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. दोघे एकमेकांना भेटतात की नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र महान खेळाडूंची जी ओळख असते, ती पुन्हा एकदा या दोघांनी दाखवून देत आदर्श घालून दिला आहे.

हे देखील वाचाFlipkart Big Saving Days Sale 2023: Flipkart सुरू आहे दमदार सेल! केवळ 8 हजारात मिळतायत हे चार दर्जेदार स्मार्टफोन..

IPL 2023: तू माझ्या कुटुंबाला शिव्या का दिल्यास..? गंभीर नंतर विराटचंही जशास तसं उत्तर; दोघांच्या भांडणाचे संभाषण आले समोर..

Railway Recruitment 2023: दहावी आणि ITI झालाय? मग रेल्वेमध्ये मिळवा नोकरी; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.