Flipkart Big Saving Days Sale 2023: Flipkart सुरू आहे दमदार सेल! केवळ 8 हजारात मिळतायत हे चार दर्जेदार स्मार्टफोन..

0

ऑफरमध्ये वस्तू खरेदी करणे प्रत्येकाला आवडत असतं. साहजिकच यामुळे कुठे ऑफर सुरू आहे. याची चौकशी प्रत्येक जण करत असतो. जर तुम्हाला देखील स्मार्टफोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या असतील, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आज पासून फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज (Flipkart Big seving day’s sale) सुरू झाला असून, या सेलमध्ये स्मार्टफोनसह अनेक वस्तू तब्बल 75 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करता येत आहेत.

स्मार्टफोन प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. आता स्मार्टफोन हे फक्त मनोरंजनाचे साधन राहिले नसून, उदरनिर्वाहाचे साधन देखील झालं आहे. साहजिकच यामुळे स्मार्टफोनला प्रचंड मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आता अनेक कंपन्या कमी किंमतीमध्ये अनेक भन्नाट फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोनची निर्मिती करत आहेत. याशिवाय आता ई-कॉमर्स वेबसाईटवर (e commerce website) देखील स्मार्टफोन खरेदीवर बंपर डिस्काउंट देण्यात येतोय.

फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर आजपासून फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर स्मार्टफोन देखील जबरदस्त डिस्काउंटमध्ये विक्री होत आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलवर विकल्या जाणाऱ्या चार दमदार स्मार्टफोन विषयी जाणून घेऊ ज्याची किंमत केवळ आठ हजाराच्या आसपास आहे.

Samsung Galaxy F04

‘फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज’ या सेलमध्ये Samsung Galaxy F04 हा दमदार स्मार्टफोन केवळ सहा हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) हा स्मार्टफोन (Smartphone) तब्बल 39 टक्के डिस्काउंटवर विक्री होत आहे. हा एक दर्जेदार स्मार्टफोन असून, याचा प्रोसेसर आणि कॅमेरा उत्तम आहे. या स्मार्टफोनला डबल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 13MP आणि 2MP कॅमेरा मिळतो. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनला देण्यात आला आहे.

Tecno Spark 8 Pro

जर तुम्ही स्मार्ट कॅमेरा फोनच्या शोधात असाल तर तुम्हाला 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असणारा स्मार्टफोन केवळ साडेआठ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही या स्मार्टफोनचे पेमेंट आयसीआयसीआय कार्डद्वारे केले, तर तुम्हाला आणखी दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला तब्बल 37% डिस्काउंट मिळत आहे. या स्मार्टफोनची बॅटरी देखील दमदार आहे. 5000mAh ची बॅटरी आणि 33W चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे.

Redmi 10A

अनेकजण रेडमी स्मार्टफोनचे चाहते असल्याचे पाहायला मिळते. जर तुम्ही रेडमीचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला या सेलमध्ये तब्बल 31 टक्के डिस्काउंटवर रेडमीचा Redmi 10A हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची बॅटरी देखील दमदार आहे. या स्मार्टफोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर Mediatek Helio G25 Octa-Core प्रोसेसर देण्यात आला आहे. जो उत्तम मानलं जात आहे. फ्लिपकार्ट वर हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ सात हजार पाचशे सत्तर रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे.

Lava Blaze 2

जर तुम्ही अधिक स्टोरेजचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर तुमचा शोध याठिकाणी पूर्ण होणार आहे. हा स्मार्टफोन लावा कंपनीचा असून याचे नाव Lava Blaze 2 असं आहे. या स्मार्टफोनचे स्टोरेज, तब्बल 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येते. या स्मार्टफोनला तब्बल 5000mAh ची बॅटरी आणि 33W चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे. कार्डवर हा स्मार्टफोन तुम्हाला १८ टक्के डिस्काउंट वर मिळत आहे. या स्मार्टफोनची किंमत आठ हजार 999 रुपये ठेवण्यात आले आहे.

हे देखील वाचा Mail Motor Service Recruitment 2023: इंडिया पोस्ट विभागात विविध पदांची भरती; या उमेदवारांना मोठी संधी..

Indian Navy Chargeman Recruitment 2023: नौदलात तब्बल इतक्या पदाची मेगा भरती; लगेच असा करा अर्ज..

Electric scooter: या आहेत 55 हजारांत मिळणाऱ्या पाच दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.