Indian Navy Chargeman Recruitment 2023: नौदलात तब्बल इतक्या पदाची मेगा भरती; लगेच असा करा अर्ज..

0

Indian Navy Chargeman Recruitment 2023: जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकांचं सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न असतं. जर तुम्ही देखील सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न बाळगले असेल तर “भारतीय नौदलामध्ये चार्जमन” पदावर नोकरी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आला आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 निश्चित करण्यात आली आहे.

पदानुसार रिक्त पदांचा तपशील

भारतीय नौदलामध्ये “चार्जमन” पदावर एकूण 372 जागा भरण्यात येणार आहेत. जाणून घेऊया, पदानुसार रिक्त पदांचा तपशील. “इलेक्ट्रिकल ग्रुप” या पदासाठी एकूण 42 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. “वेपन ग्रुप” या पदासाठी एकूण 59 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

इंजिनिअरिंग ग्रुप” या पदासाठी एकूण 141रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. “कंस्ट्रक्शन आणि मेंटेनेंस ग्रुप” या पदासाठी एकूण 118 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. “प्रोडक्शन प्लानिंग आणि कंट्रोल ग्रुप” या पदासाठी एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

भारतीय नौदलामध्ये चार्जमन” या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विज्ञानामधील भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणितामध्ये बॅचलर पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे.

वयाची अट:

भारतीय नौदलामध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांना काही वयोमर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्ष असणं आवश्यक आहे. उमेदवारांचे हे वय 29 मे पासून मोजण्यात येणार आहे. या वयोमर्यादेत एससी/ एसटी उमेदवारांना पाच वर्षाची अतिरिक्त सूट मिळणार आहे. तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे.

पगार

भारतीय नौदलामध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार, सुरुवातीचे वेतन 35 हजार चारशे रुपये दरमहा असणार आहे. याबरोबरच निवड झालेल्या उमेदवारांना या विभागाच्या नियम आणि अटीनुसार विविध भत्ते मिळणार आहेत.

निवड प्रक्रिया

या विभागामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कशा पद्धतीने केली जाणार, हे देखील आपण सविस्तर जाणून घेऊ. उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, संगणक आधारित चाचणी, त्याचबरोबर व्यापार चाचणी, कौशल्य आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याबरोबरच वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे. तसेच शारीरिक चाचणी, आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी देखील घेतली जाईल.

असा करा ऑनलाईन अर्ज

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 मे 2023 पासून अर्ज करायला सुरुवात होणार असून, 29 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन http://joinindiannavy.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर या विभागाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तुम्ही उजव्या बाजूला तीन रेषेच्या बारवर क्लिक करून, सविस्तर अर्ज करू शकता. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Electric scooter: या आहेत 55 हजारांत मिळणाऱ्या पाच दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या अधिक..

Mail Motor Service Recruitment 2023: इंडिया पोस्ट विभागात विविध पदांची भरती; या उमेदवारांना मोठी संधी..

IPL 2023: तू माझ्या कुटुंबाला शिव्या का दिल्यास..? गंभीर नंतर विराटचंही जशास तसं उत्तर; दोघांच्या भांडणाचे संभाषण आले समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.