AIIMS NORCET Recruitment 2023| AIIMS मध्ये तब्बल 3055 जागांची मेगा भरती; असा करा अर्ज..
AIIMS NORCET Recruitment 2023| जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) अंतर्गत तब्बल ३०५५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या यासंदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे निश्चित करण्यात आली आहे. जाणून घेऊया भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती. (AIIMS NORCET Bharti 2023)
रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता
नर्सिंग अधिकारी या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता B.Sc नर्सिंग तसेच GNM डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 50 बेड्स असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये 02 वर्षे काम केलेला अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलमध्ये नर्सिंग अधिकारी या पदासाठी केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता 18 ते 30 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांचे हे वय 5 मे 2023 रोजी पूर्ण असणे आवश्यक आहे. एससी/ एसटी या उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट असणार आहे.
परीक्षा फी
AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलमध्ये नर्सिंग अधिकारी या पदासाठी केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना मोठी फी आकारली जाणार आहे. ओबीसी उमेदवारांना 3 हजार रुपये फी असेल, तर या प्रवर्गातील उमेदवारांना 2400 रुपये फी असणार आहे. प्रक्रियेसाठी अर्ज करणारे उमेदवारांना ऑनलाइन फी जमा करायची आहे.
पगार
AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलमध्ये करण्यात आलेला उमेदवारांना 9 हजार 300 ते 34 हजार 800 रुपये पर्यंत दरमहा पगार दिला जाणार आहे. सोबतच इतर भत्ता म्हणून 4 हजार 600 रुपये देखील मिळणार आहेत.
निवड प्रक्रिया
AIIMS ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलमध्ये अर्ज करणारे उमेदवारांची निवड तीन परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वप्रथम लेखी परीक्षा त्यानंतर दस्तऐवज पडताळणी आणि अखेर वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या सर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मेरिट लिस्ट लावली जाणार आहे.
परीक्षेचा नमुना समजून घ्यायचा झाल्यास, निगेटिव्ह मार्किंग पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. परीक्षेला तीन तास वेळ देण्यात येईल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. EWS प्रवर्गातील उमेदवारांना 50 टक्के गुण आवश्यक आहेत ओबीसी उमेदवारांना 45 टक्के गुण, एससी/एसटी उमेदवारांना 40 टक्के गुण, PwBD/ PH: 45% गुण आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज
यावरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2023 देण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://aiimsexams.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहेत.
हे देखील वाचा Lenovo Laptop| निम्म्या किंमतीत खरेदी करा Lenovo चा दमदार लॅपटॉप; या वेबसाईटवर सुरू आहे बंपर सेल..
Mini Air Cooler: पाच मिनिटात रूम थंड करतोय हा मिनी कूलर; या वेबसाईटवर मिळतोय फक्त ५०० रुपयांत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम