Mobile Aadhaar linking: आता आधार कार्डला सिमकार्ड लिंक करणे अनिवार्य; जाणून घ्या सिमकार्ड आधारशी लिंक करण्याची प्रोसेस..

0

Mobile Aadhaar Linking: आधार कार्ड (aadhar card) शिवाय आता जीवन जगणं अशक्य आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेचा (government scheme) लाभ घ्यायचा असल्यास तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. युआयडीएआय (UIDAI) कडून देशातील नागरिकांना बारा अंकी क्रमांक दिला जातो. युआयडीएआय प्राधिकरणाकडून हा 12 अंकी क्रमांक मिळवण्यासाठी तुम्हाला डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहिती देणे आवश्यक असते. यामध्ये तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख, अंगठ्याचे ठसे, डोळ्याचे स्कॅन इत्यादी प्रक्रिया पार पडल्यानंतर, तुम्हाला तुम्हाला आधार कार्ड दिले जाते.  जाणून घ्या PAN-Aadhaar Link आहे की नाही? नसेल तर लगेच जोडा या सोप्या पद्धतीने..

अनेक दस्तऐवज जवळ ठेवण्याऐवजी एकच ओळखपत्र असावं. आणि म्हणून अनेक डॉक्युमेंट्स आधार कार्डला जोडण्याचं काम सुरू आहे. अगदी रेशन कार्ड देखील आधार कार्डला जोडून सर्वसामान्यांना आधार कार्डच्या माध्यमातून धान्य व्यतिरिक्त करण्यात येणार आहे. सरकारने या संदर्भात घोषणा देखील केली आहे. हे काम सध्या युद्धपातीवर सुरू आहे. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड यासारखे अनेक ओळखपत्र आधार कार्डला जोडणे अनिवार्य करण्यात आलं आहे.

आता मोबाईल मधील सिम कार्ड देखील आधार कार्ड लिंकशी करणे आवश्यक आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण देशात तब्बल एक कोटी पेक्षा अधिक लोकांनी आपले सिम कार्ड आधारशी लिंक केले आहे. UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने या संदर्भात माहिती दिली आहे. जानेवारी महिन्यात 56 लाख 70 हजार लोकांनी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे. तर फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण तब्बल 93 टक्क्यांहून अधिक वाढले.

जानेवारी महिन्यामध्ये १९९ .६२ कोटींच्या तुलनेमध्ये आधार प्रमाणीकरण व्यवहार फेब्रुवारीत तब्बल १३ टक्क्यांनी वाढले आहेत. फेब्रुवारीत सुमारे २२६.२९ कोटी आधार प्रमाणीकरण व्यवहार झाले आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने या वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत सुमारे ९ हजार २५५ कोटी आधार प्रमाणीकरण व्यवहारांची नोदणी केल्याची माहिती प्रसारित केली आहे.

असा करा मोबाईल नंबर आधारशी लिंक

जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल, तर भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही अद्यापही आधारशी मोबाईल नंबर लिंक केला नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही. आपण आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? याविषयी सोप्या भाषेत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइल मधील क्रोमवर जाऊन https://uidai.gov.in/ असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर UIDAI ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. नंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.

त्यांनतर तुम्हाला “आधार सेवा” हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर “तुम्हाला वेरिफाइड आधार नंबर” हा पर्याय निवडायचा आहे. नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक, Enter CAPTCHA” हे दोन पर्याय पाहायला मिळतील. तुम्हाला या दोन्ही पर्यायांमध्ये तुमचा आधार क्रमांक आणि कॅपच्या कोड व्यवस्थित टाकून “process and verify Aadhar” यावर क्लिक करायचा आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला “गो टू डॅशबोर्ड” हा पर्याय पहिला मिळेल, तुम्हाला बरोबर त्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर “Locate Enrollment Center” हा पर्याय पाहायला मिळेल, तुम्हाला तो निवडायचा आहे. आता तुम्हाला या पर्यायावर विचारण्यात आलेली सर्व माहिती कॅपच्या कोड, मोबाइल नंबर, व्यवस्थित टाकून “Locate Center” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचे सिम कार्ड आधार कार्डला लिंक होईल.

हे देखील वाचा PAN Card Apply: सात दिवसात घरपोच मिळवा पॅन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..

UPI Payment Charges: Google pay, phone pay वापरकर्त्यांचा झाला सत्यानाश; 1 एप्रिपासून तब्बल इतके रुपये शुल्क आकारला जाणार..

Aadhaar-Ration card linking: जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..

Samsung Smartphone: 9,500 रुपयात सॅमसंगचा 8 GB रॅम आणि 50 MP ट्रिपल कॅमेरा फोन; जाणून घ्या कुठे चालू आहे ऑफर..

Marriage Tips: ..होय लग्नानंतर बदलतं आयुष्य; या गोष्टी माहीत असतील तरच संसाराचा गाडा चालेल व्यवस्थित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.